औरंगाबाद जिल्ह्यात ४२७ रुग्णांची वाढ; पत्रकारासह ६ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:41 PM2020-09-14T22:41:37+5:302020-09-14T22:43:37+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजारांवर रूग्ण झाले बरे

Increase of 427 corona patients in Aurangabad district; 6 patients including journalist die | औरंगाबाद जिल्ह्यात ४२७ रुग्णांची वाढ; पत्रकारासह ६ रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात ४२७ रुग्णांची वाढ; पत्रकारासह ६ रुग्णांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या ५,७७६ रुग्णांवर सुरू उपचारएकूण मृत्यूची संख्या ८१५ झाली आहे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी पुन्हा एकदा कोरोनाने चारशेचा आकडा ओलांडला. दिवसभरात तब्बल ४२७ नव्या रुग्णांची भर पडली. तर उपचार सुरू असताना पत्रकारासह औरंगाबाद जिल्ह्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या ४२७ रुग्णांत ग्रामीण भागातील ११८, मनपा हद्दीतील ५३ , सिटी एंट्री पॉइंटवरील १३५ आणि अन्य १२१ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या २८, ८०२ झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत २२,२११ रूग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ८१५ झाली आहे. तर आजघडीला ५,७७६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात सोमवारी मनपा हद्दीतील १५६ आणि ग्रामीण भागातील २४२ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना संघर्षनगर,एन दोन सिडको, मुकुंदवाडीतील ५० वर्षीय पत्रकार, पैठण येथील ७१ वर्षीय पुरूष, सिल्लोड, उंडणगावातील ८४ वर्षीय पुरूष, पाचोड येथील ५८ वर्षीय स्त्री, कन्नड तालुक्यातील मोहरा येथील ७५ वर्षीय स्त्री, देवळाई येथील ६२ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.

ग्रामीण भागातील रूग्ण-११८

औरंगाबाद १३, फुलंब्री ३, गंगापूर ९, कन्नड ४, सिल्लोड १, वैजापूर १३, पैठण १९, वडगाव १, बजाजनगर १, आडगाव, कन्नड २, पाथरी मनूर १, तालवाडा लोणी ८, वाकळी लोणी २, यशवंत नगर, पैठण १, केकज जळगाव १, नाथ विहार, पैठण १, कापड मंडी, पैठण १, पार्क वे, पैठण १, जायकवाडी, पैठण १, संत नगर, पैठण १, दहेगाव बंगला १, नेवरगाव, गंगापूर ९, शिवाजीनगर, गंगापूर १, जीवनगंगा, वैजापूर ३, जारूळ, वैजापूर २, लाडवाणी गल्ली ५, पोलिस कॉलनी, वैजापूर १, फुलेवाडी रोड २, रेणुकादेवी गल्ली, पैठण १, टाकपूर, पैठण १, शर्मा हॉटेल जवळ,कन्नड १, खांडसरी परिसर, कन्नड १, खोजेवाडी, गंगापूर १, मांजरी गंगापूर १, सिरसगाव १, नवीन कावसान, पैठण १ 

मनपा हद्दीतील रूग्ण - ५३

एन पाच सिडको २, शांतीनिकेतन कॉलनी २, जयभवानीनगर १, एन पाच सिडको १, श्रीकृष्ण कॉलनी १, लेबर कॉलनी ५, चाऊस कॉलनी १, ज्योतीनगर २, श्रीनिकेतन कॉलनी १, उस्मानपुरा ३, बीड बायपास २, बालाजीनगर १, जय विश्वभारती कॉलनी १, भावसिंगपुरा १, राजधानी कॉलनी, सातारा परिसर ४, मामा चौक १, देवगिरी कॉलनी १, नारेगाव १, छावणी परिसर १, वेदांतनगर १, गजानननगर २, विशालनगर १, बिसमिल्ला कॉलनी १, जीवननगर १, जवाहर कॉलनी १, गजानन मंदिर परिसर १, आरेफ कॉलनी १, नागसेननगर, उस्मानपुरा १, नक्षत्रवाडी १, समर्थनगर १, आकाशवाणी परिसर १, रामपालनगर १, घाटी परिसर १, पडेगाव १, कुंभारवाडा १, अन्य ३, श्रीराम प्लाजा, सिडको १ 

सिटी एंट्री पॉइंटवरील रूग्ण- १३५

एन नऊ सिडको १, जाधववाडी १, कांचनवाडी ८, सातारा गाव १, सातारा परिसर ८, राजगुरूनगर, बीड बायपास १, आलोक नगर १, बोकुड जळगाव,पैठण १, हिवरखेडा, कन्नड १, देवानगरी २, बीड बायपास २, बेगमपुरा १, देवळाई ५, निपाणी १, मुकुंदवाडी ४, एन सहा अविष्कार कॉलनी १, चिकलठाणा १, रामनगर २, अंबिका नगर, मुकुंदवाडी १, हनुमाननगर १, मयूर पार्क ५, एन दहा, पोलिस कॉलनी १, एन नऊ सिडको १ उल्कानगरी १, जटवाडा रोड २, सुरेवाडी ४, एन अकरा सुदर्शननगर २, म्हसोबानगर १, घाटी हॉस्टेल १, गजानन कॉलनी १, जोगेश्वरी १, विटावा १, सिडको महानगर १२, रांजणगाव ४, वडगाव ३, बजाजनगर १, म्हाडा कॉलनी १, पडेगाव ४, बालाजीनगर १, वाळूज २, पंढरपूर १, माळीवाडा १, वेदांतनगर १, कांचननगर २, पैठण रोड १, आकाशवाणी १, चित्तेगाव २, पोलिस कॉलनी, तिसगाव १, कन्नड १, छत्रपतीनगर, बीड बायपास १, हर्सुल ३, एन बारा भारत मातानगर २, एन तेरा १, एन सहा सिडको १, म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल ७, एन दोन एसटी कॉलनी ३, विठ्ठलनगर, चिकलठाणा ३, एन दोन सिडको १, दशमेशनगर १, एन दोन श्रीकृष्णनगर १, रामचंद्र नगर, चिकलठाणा १, बजरंगनगर, चिकलठाणा १, जय भवानीनगर १ एन नऊ सिडको २, धूत हॉस्पीटल कर्मचारी २

Web Title: Increase of 427 corona patients in Aurangabad district; 6 patients including journalist die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.