हिवाळ्यात ज्वारीची भाकरी कशी परवडणार? गहू आणि बाजरीपेक्षाही महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2022 08:36 PM2022-10-04T20:36:09+5:302022-10-04T20:36:45+5:30

Nagpur News गेल्या तीन ते चार वर्षांत ज्वारीचा पेरा कमी झाला आहे. सध्या किरकोळ बाजारात ज्वारीचे दर दर्जानुसार ३२ ते ४० रुपये किलो आहेत.

How to afford sorghum bread in winter? Even more expensive than wheat and millet | हिवाळ्यात ज्वारीची भाकरी कशी परवडणार? गहू आणि बाजरीपेक्षाही महाग

हिवाळ्यात ज्वारीची भाकरी कशी परवडणार? गहू आणि बाजरीपेक्षाही महाग

Next
ठळक मुद्देदर्जानुसार ३२ ते ४० रुपये किलो

नागपूर : हिवाळ्यात ज्वारीला अचानक मागणी वाढते. त्या प्रमाणात दरही वाढतात. तसे पाहता गेल्या तीन ते चार वर्षांत ज्वारीचा पेरा कमी झाला आहे. सध्या किरकोळ बाजारात ज्वारीचे दर दर्जानुसार ३२ ते ४० रुपये किलो आहेत. जीवनावश्यक वस्तूंसह धान्याच्या किमतीही आकाशाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.

गहू २७ ते ३२ रुपयांवर

कृषी उत्पन्न बाजार समिती आणि किरकोळ बाजारात गव्हाचे दर दर्जानुसार २७ ते ३२ रुपये किलो आहेत. यंदा उत्पादन कमी झाल्यामुळे गव्हाचे भाव वाढले आहेत.

ज्वारी ३२ ते ४० रुपये

काही वर्षांआधी विदर्भातही ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व्हायचे. आता पेरणी फारच कमी आहे. नागपुरात विकण्यात येणारी ज्वारी अन्य जिल्ह्यातू येते. हॉटेल्समध्येही ज्वारीच्या भाकरीला मागणी वाढली आहे. दर्जानुसार दर ३२ ते ४० रुपये आहेत.

बाजरी ३० रुपयांवर

हिवाळ्यात बाजारीला मागणी वाढते. नागपूर जिल्ह्यात बाजारीचे उत्पादन होत नाही. बाहेरील जिल्ह्यात बाजारीची आवक होते. सध्या दर्जानुसार २८ ते ३२ रुपये दर आहेत.

हिवाळ्यात ज्वारीला वाढते मागणी

हिवाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घेतली जाते. या दिवसात नागरिकांचा पौष्टिक खानपानावर जास्त भर असतो. यंदा हिवाळ्यात ज्वारी आणि बाजरीला जास्त मागणी राहील.

म्हणून वाढले ज्वारीचे भाव

अन्य जिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात ज्वारी विक्रीसाठी येत असल्यामुळे ज्वारीचे भाव वाढल्याचे धान्य विक्रेत्यांचे मत आहे. पांढऱ्या प्रकारातील ज्वारीला जास्त मागणी असते. या ज्वारीचे दर ४५ रुपये किलोपर्यंत आहेत.

हिवाळ्यात ज्वारीला मागणी वाढते. त्या प्रमाणात दरही वाढतात. गेल्या काही वर्षांपासून विदर्भात ज्वारीच्या उत्पादनात घट होत आहे. जास्त मागणी आणि पुरवठा कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत. ग्राहकांना दर्जेदार ज्वारी हवी असते आणि त्या प्रमाणात पैसे मोजण्यास तयार असतात.

रमेश उमाठे, धान्य विक्रेते.

Web Title: How to afford sorghum bread in winter? Even more expensive than wheat and millet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न