स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबईत १० हजार झाडांची रोपटी मोफत देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2022 05:12 PM2022-08-11T17:12:06+5:302022-08-11T17:12:31+5:30

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने चार जातींची १० हजार रोपे पूर्णपणे मोफत देणार आहेत.

10 thousand plants will be given for free in Mumbai on the occasion of Amrit Mahotsav of Independence | स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबईत १० हजार झाडांची रोपटी मोफत देणार

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबईत १० हजार झाडांची रोपटी मोफत देणार

Next

मुंबई - भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त रतनशी मंजूशांती फाऊंडेशनच्या वतीने अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. हरित पट्ट्यात योगदान देण्यासाठी मुंबईत रतनशीच्या वतीने १० हजार झाडांची रोपटी मोफत देण्यात येणार आहेत. ताम्हण, शेतुर, कदंब आणि कडुलिंबाच्या रोपट्यांचा यात समावेश आहेत.

रतनशी हे फलोत्पादन आणि बागकामाचे समानार्थी नाव मानले जाते. जवळपास ५० वर्षांहून अधिक जुनी असलेली ही कंपनी या क्षेत्रातील अग्रणी आहे. हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन असल्याने देशभरात आनंद आणि उत्सव साजरा करण्यात येत आहे. रतनशी मंजुशांती फाउंडेशनने सुरु केलेला उपक्रम हरित पर्यावरणाच्या दिशेने काम करण्यासाठी समर्पित आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने ती चार जातींची १० हजार रोपे पूर्णपणे मोफत देणार आहेत.

कदंब, कडुलिंब, ताम्हण आणि शेतुर या चार जातींची रोपे आपल्या प्रदेशासाठी योग्य आहेत आणि काही वेळातच त्यांची सुंदर झाडे तयार होतील. प्रत्येकाला जिथे जमेल तिथे झाड लावण्यासाठी प्रोत्साहित करणे, शहराला हिरवेगार आणि भावी पिढ्यांसाठी सुंदर भविष्य बनवण्यात योगदान देणे हा यामागचा उद्देश आहे. वितरीत केलेली झाडे चांगली वाढलेली आणि आपल्या प्रदेशासाठी योग्य असतील. एका व्यक्तीला जास्तीत जास्त चार रोपे दिली जातील आणि मोफत वाटप स्टॉक संपेपर्यंत चालू राहील असं फाऊंडेशनकडून सांगण्यात आले आहे. 

वितरणाची तारीख : १२ आणि १३ ऑगस्ट २०२२
वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ६
पत्ता - १७५, डॉ. आंबेडकर रोड, भायखळा स्टेशन (पूर्व) समोर, मुंबई – ४०० ०२७
दूरध्वनी : २३७२३२९६

Web Title: 10 thousand plants will be given for free in Mumbai on the occasion of Amrit Mahotsav of Independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.