"बाहुबली"मधील कलाकारांचं मानधन किती ? घ्या जाणून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2017 01:31 PM2017-05-03T13:31:53+5:302017-05-03T13:51:46+5:30

चित्रपट कोटींची कमाई करत असला तरी या चित्रपटासाठी कलाकारांना नेमकं किती मानधन मिळालं याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे

How is the honor of artists in "Bahubali"? Learn to take | "बाहुबली"मधील कलाकारांचं मानधन किती ? घ्या जाणून

"बाहुबली"मधील कलाकारांचं मानधन किती ? घ्या जाणून

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - बाहुबली चित्रपटाची यशस्वी घोडदौड चालू असून बॉक्स ऑफिसवर रोज नवनवे रेकॉर्ड केले जात आहेत. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत रोज यशाचे नवे शिखर गाठणारा हा चित्रपट 1000 कोटींहून जास्त कमाई करेल असा अंदाज समीक्षकांनी लावला आहे. एस एस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या या भव्यदिव्य चित्रपटाच प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा डग्गुबती, तमन्न, सत्यराज यांनी मुख्य भूमिका निभावल्या आहेत. 
 
चित्रपट कोटींची कमाई करत असला तरी या चित्रपटासाठी कलाकारांना नेमकं किती मानधन मिळालं याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 
 
आता सर्वात महत्वाची व्यक्ती ती म्हणजे एस एस राजामौली. ज्यांच्या खांद्यावर चित्रपटाची संपुर्ण जबाबदारी होती ते दिग्दर्शक राजामौली. चित्रपट कोटींची उड्डाणे घेत असून निर्मात्यांना फार मोठा फायदा होणार आहे हे नक्की. मिळालेल्या माहितीनुसार नफ्यातील एक तृतीयांश भाग एस एस राजामौली यांच्या वाट्याला य़ेणार आहे. 
 

Web Title: How is the honor of artists in "Bahubali"? Learn to take

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.