पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका ; साडेचार हजार हेक्टरवर शेतीचं नुकसान : जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 08:49 PM2021-07-26T20:49:55+5:302021-07-26T20:52:24+5:30

पंचनाम्यांचा अंतिम अहवाल गुरुवारपर्यंत प्राप्त होणार...

Heavy rains hit Pune district; Damage to agriculture on four and a half thousand hectares: District Collector Dr. Rajesh Deshmukh | पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका ; साडेचार हजार हेक्टरवर शेतीचं नुकसान : जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख

पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका ; साडेचार हजार हेक्टरवर शेतीचं नुकसान : जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख

Next

पुणे : जिल्ह्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावर गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे व शेत पिके आणि जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक नजर अंदाज आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आली असून आठवडाभरात पंचनाम्याचा अंतिम अहवाल प्राप्त होतील अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हे, मावळ मुळशी पश्चिम घाट माथ्यावर तुफान पाऊस झाला. अतितीव्र पावसामुळे मावळ भागातील भात पिके तसेच जमिनीचे बांध फुटणे जमीन खरडून जाणे अशा प्रकारचे नुकसान झाले आहे. प्राथमिक नजर अंदाजानुसार साडेचार हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिके आणि काही प्रमाणात जमिनीचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्षात पंचनाम्याची अंतिम कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा खरा आकडा समोर येईल. 

याबाबत देशमुख यांनी सांगितले, गावपातळीवर तलाठी , सर्कल,  कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्यामार्फत पंचनाम्याची कारवाई केली जाईल. अद्यापही काही भागात मोठा पाऊस असल्याने पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. थोडीशी उघडीप मिळताच पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल.

Web Title: Heavy rains hit Pune district; Damage to agriculture on four and a half thousand hectares: District Collector Dr. Rajesh Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.