मोठी बातमी; भिमानगर पुलाजवळ ट्रक -टँकरचा अपघात; पाच जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 08:35 AM2021-11-28T08:35:25+5:302021-11-28T08:35:54+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; Truck-tanker accident near Bhimanagar bridge; Five people were killed on the spot | मोठी बातमी; भिमानगर पुलाजवळ ट्रक -टँकरचा अपघात; पाच जण जागीच ठार

मोठी बातमी; भिमानगर पुलाजवळ ट्रक -टँकरचा अपघात; पाच जण जागीच ठार

googlenewsNext

टेंभुर्णी : माढा तालुक्यात भीमानगर पुलाजवळ शनिवारी रात्री ११ वाजता मळीचा टँकर आणि तांदळाच्या ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन पाचजण जागीच ठार झाले तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मळीचा टँकर (एम. एच. १४ / सी.पी. ४०२०) हा इंदापूरहूनसोलापूरकडे निघालेला होता. सोलापूर हद्दीतील माढा तालुक्यात भीमा नगर येथे एका पुलाजवळ सरदारजी ढाब्यासमोर हा टँकर आला असता समोरुन येणारा तांदळाचा ट्रक (एम.एच.२५ / यू४०४५) रस्ता दुभाजकाला धकडून समोरून येणा-या या टँकरवर जोरदार आदळला.

हा अपघात इतका भीषण होता की मळीच्या टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रक पलटी होऊन चालकाच्या केबीनमधे बसलेले पाचजण जागीच ठार झाले. ट्रकमधील लहान मुलं आणि स्त्रीयांसह तीनजण जखमी झाले असून त्यांना इंदापूर जवळील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातातील ट्रक हा सोलापूरमधून तांदळाची गोणी घेऊन मुंबईकडे निघालेला होता. या अपघातात दोन लहान मुले, महिला जखमी झाले आहेत. सर्व जखमींची प्रकृती गंभीर असून इंदापूर जवळील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

Web Title: Big news; Truck-tanker accident near Bhimanagar bridge; Five people were killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.