हृदय पिळवटणारा आक्रोश! दांडीया पाहून गावी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 07:02 PM2021-10-13T19:02:59+5:302021-10-13T19:04:29+5:30

Accident Case : कचरा डंपरला धडक : शाहुपूरीतील दुर्घटना; दोघे गंभीर जखमी

A heart-wrenching cry! Accidental death of a two-wheeler returning to the village after seeing Dandiya | हृदय पिळवटणारा आक्रोश! दांडीया पाहून गावी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

हृदय पिळवटणारा आक्रोश! दांडीया पाहून गावी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात नवरात्रोत्सवाचा दांडीया पाहून गावी परत जाताना ही दुर्घटना घडली.दुर्घटनेत दुचाकीवर पाठीमागे बसलेले शिवाजी विकास नेमणे (१८, रा. कांटे, शाहूवाडी) व करण पाटील (रा. काळजवडे, पन्हाळा) हे दोघे गंभीर जखमी झाले.

कोल्हापूर/ बाजाभोगाव : कचरा भरून निघालेल्या डंपरला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्याचे दोघे साथीदार गंभीर जखमी झाले. ओमकार दिनकर मुगडे (१९, रा. काळजवडे, ता. पन्हाळा) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुर्घटनेत दुचाकीवर पाठीमागे बसलेले शिवाजी विकास नेमणे (१८, रा. कांटे, शाहूवाडी) व करण पाटील (रा. काळजवडे, पन्हाळा) हे दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शाहुपूरी पाचव्या गल्लीत गवत मंडईनजीक घडला. कोल्हापुरात नवरात्रोत्सवाचा दांडीया पाहून गावी परत जाताना ही दुर्घटना घडली.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महानगरपालिकेच्या कचरा उठाव डंपरवर सतीश देवेकर हे चालक म्हणून काम करतात. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ते कचरा गोळा करण्यासाठी डंपर घेऊन गोकुळ हॉटेलकडून गवत मंडईकडे जात होते. पटेल स्पेअरपार्टजवळ डंपर आला असता पाचव्या गल्लीतून भरधाव आलेल्या दुचाकीने डंपरच्या इंधन टाकीजवळ जोराची धडक दिली. अपघातानंतर देवेकर यांनी डंपर थांबवून उतरून पाहिले तेव्हा तिघे तरुण गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. जखमींना अग्निशमन वाहनांच्या मदतीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. अपघातातील ओंकार मुगडे याच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाल्याने अंतर्गत रक्तस्त्राव होऊन त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर इतर दोघा सहकाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.


गावी जाताना दुर्घटना
अपघातातील ओंकार मुगडे, शिवाजी नेमणे व करण पाटील हे तिघेही पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील आहेत. त्यांच्या गावातील एकाचे शहरात हॉटेल असून तिघेही तिथे काम करत होते. नवरात्रीनिमित्त देवदर्शन व दांडीया पाहण्याचे ठरवून तिघे हॉटेलवरून निघाले. शहरात फेरफटका मारून तिघेही गावी जाणार होते. तोपर्यंत दुर्घटना घडली.


हृदय पिळवटणारा आक्रोश
ओंकार मुगडे हा हॉटेलमध्ये काम करून कोपार्डे (ता. करवीर) येथील स. ब. खाडे महाविद्यालयात प्रथम वर्ग बी. ए. च्या वर्गात शिकत होता. आई-वडील शेती करून उदरनिर्वाह करत आहेत. घरची परिस्थिती बेताची आहे. त्याच्या मृत्यूची बातमी घरी कळताच नातेवाईकांनी हृदय पिळवटणारा अक्रोश केला. त्याच्या पश्चात वडील, आई, दोन बहिणी असा परिवार आहे. सकाळी काळजवडे गावातच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: A heart-wrenching cry! Accidental death of a two-wheeler returning to the village after seeing Dandiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.