धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:24 PM2019-09-04T12:24:45+5:302019-09-04T12:49:40+5:30

तब्बल दीड तासानंतर दुसरे इंजिन झाले रवाना

Dharmabad-Manmad High Court Express engine shut down near Karmad | धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन पडले बंद

धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन पडले बंद

googlenewsNext
ठळक मुद्देमनमाड- काचीगुडा पॅसेंजर गाडीला चिखलठाणा रेल्वे स्टेशन येथे थांबविण्यात आले दुपारी १२ च्या दरम्यान दुसरे इंजिन रवाना करण्यात आले

बदनापूर/औरंगाबाद : बदनापूरहुन औरंगाबादकडे जाणाऱ्या धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन करमाड येथे अचानक बंद पडले.  सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान अचानक मोठा आवाज होऊन हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन बंद पडले. यामुळे सुमारे दोन तास प्रवास्यांचे अतोनात हाल झाले. दरम्यान, धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेस बंद पडल्याने मनमाड- काचीगुडा पॅसेंजर गाडीला चिखलठाणा रेल्वे स्टेशन येथे थांबवून ठेवण्यात आली.

सकाळी साडेनऊ ला बदनापूरहुन मनमाडकडे जाणारी हायकोर्ट एक्सप्रेस आज करमाडजवळ गेल्यानंतर तिचे इंजिन अचानक फेल झाले त्यामुळे हजारो प्रवासी मधेच अडकले. त्यानंतर औरंगाबादहून मनमाड-काचीगुडा ही रेल्वे बदनापूरकडे जात असताना तिला चिकलठाणा येथे थांबविण्यात आले. या गाडीचे इंजिन करमाडकडे हायकोर्टसाठी पाठविण्यात आले. त्यामुळे मनमाड काचीगुडा या पॅसेंजर रेल्वेतील प्रवाशीही चिकलठाणा रेल्वे स्थानकावर तासनतास अडकले. सुमारे बारा वाजेच्या सुमारास हायकोर्ट एक्सप्रेस चिकलठाणा येथे आली होती. मात्र दोन तास ताटकळल्याने या दोन्ही रेल्वेतील हजारो रेल्वे प्रवाशांची मोठी दयनीय अवस्था झाली होती. 

मनमाड-काचीगुडा या रेल्वेतील अनेक प्रवासी बारा वाजेच्या सुमारास आलेल्या सचखंड एक्सप्रेसमध्ये बसुन पुढील प्रवासासाठी निघाले. मात्र मनमाड काचीगुडा हि रेल्वे चिकलठाणा स्थानकावरच उभी होती. या पॅसेंजरमधून प्रवास करणारे दिपक मुंडलीक म्हणाले की, रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभारामुळे प्रवास्यांचे हाल झाले. ही पॅसेंजर चिकलठाणामध्ये  उभी करण्यापेक्षा करमाडपर्यंत आणली असती तर प्रवास्यांना पुढे अन्य वाहनांनी जाता आले असते त्यांचा वेळही वाचला असता.

मनमाड- काचीगुडा पॅसेंजरसाठी जालन्याहून इंजिन 
रेल्वे विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, करमाडजवळ  धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान अचानक बंद पडले. या रेल्वेसाठी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनमाड- काचीगुडा या पॅसेंजर रेल्वेचे इंजिन पाठविण्यात आले आहे. इंजिन करमाड रेल्वे स्टेशनच्या दिशेन रवाना झाले असून या इंजिनच्या सहाय्याने धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेस औरंगाबादकडे आणण्यात येईल. या दरम्यान  मनमाड- काचीगुडा पॅसेंजर चिखलठाणा रेल्वेस्टेशनवर थांबवून ठेवली आहे. या पॅसेंजर गाडीसाठी जालना येथून दुसरे इंजिन मागविण्यात आले आहे.

दरम्यान, इंजीनन काढल्याने मनमाड-काचीगुडा पॅसेंजर रेल्वेतील प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेस चिखलठाणा येथे अडवून ठेवली.

Web Title: Dharmabad-Manmad High Court Express engine shut down near Karmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.