वाह रे चोर! चोरांनी चोरी केल्यावर ठेवून गेले पैसे आणि एक चिठ्ठी, वाचा काय लिहिलं होतं त्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 01:12 PM2021-10-01T13:12:54+5:302021-10-01T13:14:01+5:30

'द सन' मध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, चोरांनी जेव्हा घरात चोरी केली तेव्हा वयोवृद्ध महिला टीव्ही बघत होती. चोरांनी चोरीनंतर एक लेटर लिहून ठेवलं.

Thief left special note and money for stealing flower pot UK | वाह रे चोर! चोरांनी चोरी केल्यावर ठेवून गेले पैसे आणि एक चिठ्ठी, वाचा काय लिहिलं होतं त्यात

वाह रे चोर! चोरांनी चोरी केल्यावर ठेवून गेले पैसे आणि एक चिठ्ठी, वाचा काय लिहिलं होतं त्यात

googlenewsNext

यूनायटेड किंगडमच्या कॉर्नवाल काउंटीमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे चोरांनीचोरी केल्यावर ८० वर्षीय वयोवृद्ध महिलेसाठी एक स्पेशल नोट लिहून ठेवली. ज्यात  लिहिलं होतं की, तुम्ही नेहमी सुरक्षित आणि खूश रहा. या नोटसोबत चोरांनी घरात काही पैसेही ठेवले.

काय लिहिलं होतं नोटमध्ये?

'द सन' मध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, चोरांनी जेव्हा घरात चोरी केली तेव्हा वयोवृद्ध महिला टीव्ही बघत होती. चोरांनी चोरीनंतर एक लेटर लिहून ठेवलं. त्यात लिहिलं होतं की, हॅलो, तुम्ही जे कुणी असाल. आम्ही तुमच्या एक वस्तू यासाठी चोरी करत आहोत कारण त्याची आम्हाला फार गरज आहे. 

घरात पैसे ठेवून गेले

नोटमध्ये चोरांनी पुढे लिहिलं की, तुमची एक कुंडी आम्हाला इतकी आवडली की, आम्ही स्वत:ला रोखू शकलो नाही. आम्ही या कुंडी किंमत म्हणून  इथे  १५ यूरो म्हणजे १ हजार २८९ रूपये ठेवत आहोत. आशा आहे की, ही कुंडी इतक्याच रूपयांची असेल. तुम्हाला दिलेल्या त्रासाबद्दल आम्हाला खेद आहे.

वयोवृद्ध महिला हॉली म्हणाल्या की, त्यांना विश्वास बसत नाहीये की, कुणी चोर चोरी केल्यावर पैसे पण ठेवून गेले. मी याआधी कुणासोबतही असं झाल्याचं पाहिलं नाही. चोरांनी ही नोट दरवाज्यातून माझ्या घरात टाकली होती. 

महिलेने सांगितलं की, रात्री साधारण ९ वाजून १५ मिनिटांनी कुंडी त्यांच्या घरातून चोरी झाली होती. कुंडी त्यांच्या लिविंग रूममध्ये ठेवली होती. कुंडी त्यांची फेवरेट होती. चोरांनी कुंडी चोरी करून चांगलं काम केलं नाही. त्या ती कुंडी कोणत्याही किंमतीला विकणार नव्हता.
 

Web Title: Thief left special note and money for stealing flower pot UK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.