आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात ऐनवेळी बदल ; केंद्रावर पोहोचेलेल्या विद्यार्थ्यांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 03:45 PM2021-10-12T15:45:32+5:302021-10-12T15:49:06+5:30

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध शाखांच्या प्रथमवर्ष उन्हाळी सत्र परीक्षा मंगळवार (दि.१२) पासून सुरू होणार होत्या. मात्र या परीक्षेंतर्गत होमिओपॅथी विद्याशाखेच्या प्रथम वर्षाचा मंगळवारी सकाळी साडेदजहा वाजता होणारा पेपार अचानक रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली.

Disappointment of the students who reached the center in time for the change in the examination schedule of the health university | आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात ऐनवेळी बदल ; केंद्रावर पोहोचेलेल्या विद्यार्थ्यांची निराशा

आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात ऐनवेळी बदल ; केंद्रावर पोहोचेलेल्या विद्यार्थ्यांची निराशा

Next
ठळक मुद्दे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र प्रथमवर्ष परीक्षा परीक्षेच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदलामुळे विद्यार्थ्यांची निराशा

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध शाखांच्या प्रथमवर्ष उन्हाळी सत्र परीक्षा मंगळवार (दि. १२) पासून सुरू होणार होत्या. मात्र या परीक्षेंतर्गत होमिओपॅथी विद्याशाखेच्या प्रथम वर्षाचा मंगळवारी सकाळी साडेदजहा वाजता होणारा पेपार अचानक रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र विद्यापीठाकडून प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या विद्यार्थी अपात्रतेविषयीच्या पत्राचे कारण देत उशीरा प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पात्रतेविषयी पेच निर्माण झाल्याने अशा विद्यार्थ्यांचे नूकसान टाळण्यासाठी ऐनवेळी परीक्षा पुढे ढकरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रथम, द्वीतीय व तृतीय वर्षाच्या परीक्षांना मंगळवार (दि.१२) पासून सुरूवात होऊन या परीक्षा ३० ऑक्टोबरपर्यंत चालणार होत्या. मात्र होमिओपॅथी विद्याशाखेचा मंगळवारी पहिला पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यापीठाने ऐनवेळी हा पेपर रद्द करून वेळापत्रकात बदल केला आहे. परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध विद्याशाखांच्या उन्हाळी २०२१ सत्राच्या परीक्षा राज्यातील विविध १७७ परीक्षा केद्रांवर घेण्यात येत आहेत. परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवार (दि.१२) होमिओपॅथी विद्याशाखेची परीक्षा सुरू होणार होती. परंतु, प्रशासकीय कारणास्तव यात बदल करण्यात आला आहे. प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून ८ ऑक्टोबरला विद्यापीठाला प्राप्त पत्रानुसार उशीरा प्रवेशित झालेले काही विद्यार्थी या परीक्षेला पात्र नसल्याचे कळविण्यात आले होते. त्यामुळे प्रवेश नियमामक प्राधमिकरणाच्या मान्यतेच्या अभावी परीक्षेस बसू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेविषयी पेच निर्णाण झाला होता. पहिल्या दिवसाच्या पेपरसाठी जवळपास १५६ विद्यार्थी अपात्र ठरून परीक्षेपासून वंचित राहणार असल्याने ही परीक्षा तत्काळ रद्द करण्यात आली. या संदर्भात बुधवारी (दि. १३) प्रवेश नियामक प्राधिकरणाची मुंबई येथे बैठक होणार असून या बैठकीत विद्यार्थ्यांच्या पात्रतेविषयी निर्णय झाल्यानंतर सर्वच विद्याशाखांच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होऊ शकतील, आशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, विषयी परीक्षेच्या वेळापत्रकातील बदलाबाबत माहिती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना सूचित करण्यासंदर्भातही विद्यापीठाकडून सुचना करण्यात आल्या आहेत.

Web Title: Disappointment of the students who reached the center in time for the change in the examination schedule of the health university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.