लासूर स्टेशन आरोग्य केंद्रात सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:06 AM2021-04-23T04:06:37+5:302021-04-23T04:06:37+5:30

गंगापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लासूर स्टेशनसह ५८ गावे, ७ उपकेंद्र आहेत. ७० हजार लोकसंख्या उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून ...

Lack of facilities at Lasur Station Health Center | लासूर स्टेशन आरोग्य केंद्रात सुविधांची वानवा

लासूर स्टेशन आरोग्य केंद्रात सुविधांची वानवा

googlenewsNext

गंगापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लासूर स्टेशनसह ५८ गावे, ७ उपकेंद्र आहेत. ७० हजार लोकसंख्या उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ आरोग्य अधिकाऱ्यांसह १५ कर्मचारी आहेत. स्टाफ नर्सची जागा खाली आहे. तसेच चार परिचरांची गरज असताना दोनच परिचर उपलब्ध आहेत. या आरोग्य केंद्राची इमारतही जुनाट झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून १ फेब्रुवारीपासून या आरोग्य केंद्रांतर्गत २ हजार ३४१ नागरिकांची कोरोना चाचणी केली. यात ५६६ कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. मात्र, लोकसंख्येच्या मानाने कर्मचारी अपुरे पडत आहेत. तसेच आपत्कालीन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

फोटो : प्रा. आरोग्य केंद्राची इमारत.

220421\img_20210422_172424_1.jpg

प्रा. आरोग्य केंद्राची इमारत.

Web Title: Lack of facilities at Lasur Station Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.