कौतुकास्पद ! सीएस परीक्षेत औरंगाबादचा सुदर्शन महर्षी देशात प्रथम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 07:55 PM2021-02-26T19:55:47+5:302021-02-26T19:57:45+5:30

विशेष म्हणजे, सुदर्शन याने सीए आणि सीएस या दोन्ही कठीण परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या आहेत.

Admirable! Sudarshan Maharshi of Aurangabad is first in the country in CS examination | कौतुकास्पद ! सीएस परीक्षेत औरंगाबादचा सुदर्शन महर्षी देशात प्रथम 

कौतुकास्पद ! सीएस परीक्षेत औरंगाबादचा सुदर्शन महर्षी देशात प्रथम 

googlenewsNext

औरंगाबाद : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) च्या औरंगाबाद शाखेसाठी आज ऐतिहासिक दिवस ठरला आहे. या शाखेचा विद्यार्थी सुदर्शन महर्षी याने कंपनी सेक्रेटरी (सीएस, व्यावसायिक - जुना अभ्यासक्रम ) परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सीए सुदर्शन महर्षी यांने 900 पैक्की ५५२ गुण मिळवत या बहुमान प्राप्त केला. राष्ट्रीय पातळीवर अव्वल क्रमांक मिळवणारा औरंगाबाद शाखेतला तो पहिला विद्यार्थी ठरला आहे. विशेष म्हणजे, सुदर्शन याने सीए आणि सीएस या दोन्ही कठीण परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या आहेत.
 
या यशावर बोलताना सुदर्शन म्हणाला की, मी अत्यंत आनंदी असून माझ्या मेहनत आणि समर्पणाचे हे यश आहे. मे २०१६ मध्ये सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करण्याचा माझा विचार होता. परंतु, सीएस बनून अधिक कौशल्य प्राप्त करण्याचे मी ठरवले. या दरम्यान, मी दोन कंपन्यांमध्ये काम केले. पण अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी दोन्ही नोकऱ्या सोडल्या. त्यात कोव्हीडमुळे मिळालेल्या सक्तीच्या सुट्या एकप्रकारे बक्षीसच ठरल्या. कारण मी दिवसातील 10 ते 12 तास अभ्यास करू शकलो. या परीक्षेत लेखन कौशल्य आणि सादरीकरण हे खूपच महत्त्वाचे आहे. यासाठी मला माझा सीए परीक्षेचा अनुभव उपयोगी पडला, असेही त्याने सांगितले. सुदर्शनचे सर्व शिक्षण औरंगाबादमध्येच झाले आहे. तो श्री गुरु तेग बहादूर शाळेचे विद्यार्थी आहे. त्याचे बीकॉम देवगिरी महाविद्यालयात तर एमकॉम सरस्वती भुवन महाविद्यालयातून झाले आहे. 

संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी केली 
मला कोणताही क्रमांक मिळवायचा नव्हता, मात्र सीएसचा संपूर्ण अभ्यास क्रमांकाची सखोल तयारी करायचा मी सुरुवातीपासून संकल्प केला होता. अभ्यासाअंती मी कोणत्याही प्रश्नासाठी तयार होतो. सुधारणा आणि परिपूर्णता हेच माझे लक्ष्य होते. कोणतीही खाजगी शिकवणी घेतली नसून केवळ स्वयं अध्ययनावर भर दिला. तसेच परीक्षेच्या तयारीसाठी आयसीएसआय मॉड्यूल्सचा वापर केला आणि यश मिळवले.
- सुदर्शन महर्षी

Web Title: Admirable! Sudarshan Maharshi of Aurangabad is first in the country in CS examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.