Goa Election 2022: “...तर उत्पल पर्रिकरांविरोधात अन्य पक्षांनी उमेदवार देऊ नये”; संजय राऊतांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 11:59 AM2022-01-17T11:59:11+5:302022-01-17T12:01:07+5:30

Goa Election 2022: मनोहर पर्रिकर यांना तीच खरी श्रद्धांजली असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

goa election 2022 sanjay raut said if utpal parrikar contest independent other parties should support him | Goa Election 2022: “...तर उत्पल पर्रिकरांविरोधात अन्य पक्षांनी उमेदवार देऊ नये”; संजय राऊतांचे आवाहन

Goa Election 2022: “...तर उत्पल पर्रिकरांविरोधात अन्य पक्षांनी उमेदवार देऊ नये”; संजय राऊतांचे आवाहन

Next

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकांच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आताच्या घडीला भाजपमधून बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अन्य सर्व पक्षांना आवाहन करत उत्पल पर्रिकर यांच्याविरोधात उमेदवार देऊ नयेत, असे म्हटले आहे. 

माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजपकडे तिकिटासाठी दावा केला आहे. भाजपने त्यांना तिकीट न देण्याचे संकेत दिले असले तरी, त्यांना तिकीट नाकारणेही महागात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसमोर त्रांगडे निर्माण झाले आहे. तसेच भाजपने उमेदवारी नाकारल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी उत्पल पर्रिकर यांनी केल्यामुळे भाजपसमोरील पेच वाढल्याचे सांगितले जात आहे. अशातच संजय राऊत यांनी सर्वपक्षीयांना आवाहन केले आहे. 

उत्पल पर्रिकर यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे

मनोहर पर्रिकर हे गोव्याचे प्रमुख नेते होते. गोव्याच्या विकासात त्यांचे नक्कीच योगदान होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाशी भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारे अपमान केला आहे, हे कोणाच्या मनाला पटलेले नाही. पर्रिकरांच्या कुटुंबाविषयी तुम्ही अशा प्रकारे बोलताय तर तुमची लायकी काय, अशी विचारणा करत, उत्पल पर्रिकर जर अपक्ष लढणार असतील, तर सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे. आप, काँग्रेस, तृणमूल आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी उत्पल पर्रिकरांविरोधात उमेदवार देऊ नये, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. 

भाजपला उमेदवारी द्यावीच लागेल

भाजपला उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी द्यावीच लागेल, याची मला खात्री आहे. आमचा दबाव आहे. आम्ही सगळे त्यांच्या पाठी उभे राहिलो म्हणून भाजपला उमेदवारी द्यावीच लागणार आहे. मनोहर पर्रिकर यांना तीच खरी श्रद्धांजली असेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, महाराष्ट्रातील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना, वैफल्य आहे. निराशा आहे. त्यातून अशा प्रकारची भाषा वापरली जात आहे. अटलींचे संस्कार ते विसरले आहेत, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.
 

Web Title: goa election 2022 sanjay raut said if utpal parrikar contest independent other parties should support him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.