ही अभिनेत्री चुकून पुरूषांच्या टॉयलेटमध्ये शिरली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 12:10 PM2019-09-08T12:10:59+5:302019-09-08T12:11:31+5:30

होय, एकदा ती चुकून पुरूषांच्या टॉयलेटमध्ये शिरली आणि पुढे जे काही झाले, ते ऐकून सगळ्यांनाच हसू अनावर झाले.

nushrat bharucha once entered in mens toilet by mistake | ही अभिनेत्री चुकून पुरूषांच्या टॉयलेटमध्ये शिरली आणि...

ही अभिनेत्री चुकून पुरूषांच्या टॉयलेटमध्ये शिरली आणि...

googlenewsNext
ठळक मुद्देनुसरत भरूचा सध्या ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यात ती आयुष्यमान खुराणासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

काही लोक चुकून चुकीच्या टॉयलेटमध्ये जातात आणि त्यांच्यावर फजितीचा प्रसंग ओढवतो. बॉलिवूडची ही अभिनेत्रीही अशीच. होय, एकदा ती चुकून पुरूषांच्या टॉयलेटमध्ये शिरली आणि पुढे जे काही झाले, ते ऐकून सगळ्यांनाच हसू अनावर झाले. एका ताज्या मुलाखतीत तिने स्वत: हा विचित्र अनुभव शेअर केला. ही अभिनेत्री कोण तर नुसरत भरूचा.
होय, तुला कधी विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे का? असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर तिने हा किस्सा सांगितला. एकदा मी चुकून पुरूषांच्या टॉयलेटमध्ये गेले होते, असे तिने सांगितले.

ती म्हणाली, एकदा मी चुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेले होते. इतके बरे की,आत कोणीच नव्हते. मी लगेच धावत बाहेर आले.  त्यावेळी आत कोणी असते किंवा बाहेरुनही कोणी आत आले असते तर  सर्वासमोर माझी लाज गेली असती.


आजकाल टॉयलेट्सच्या दरवाज्यांवर वेगवेगळे आर्ट-वर्क केलेली दिसतात. टॉयलेट्सवर वेगवेगळी चिन्ह असतात, त्यामुळे टॉयलेट पुरुषांचे की महिलांचे हे समजते. मात्र त्यात खूप क्रिएटीव्हीटी दिसते. इतकी की, अनेकदा गोंधळ उडतो, असेही ती म्हणाली.


नुसरत भरूचा सध्या ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यात ती आयुष्यमान खुराणासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात, आयुष्यमान एक मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. होय, नोकरी मिळवण्यासाठी तो मुलीच्या आवाजात बोलायला तयार होतो. कॉल सेंटरमध्ये त्याला नोकरी मिळते. सोबत पूजा हे नावही. पूजा नावाच्या या मुलीसाठी अनेकजण जीव ओवाळून टाकायला तयार होतात आणि त्यानंतर तिथे जो काही गोधंळ उडतो तेच या सिनेमात दाखवण्यात आले आहे. येत्या 13 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Web Title: nushrat bharucha once entered in mens toilet by mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.