BSNL च्या 4G सेवांच्या लाँचची झाली घोषणा; खासगी कंपन्यांची साथ सोडणार का ग्राहक?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 01:59 PM2021-12-03T13:59:31+5:302021-12-03T14:01:14+5:30

BSNL 4G Services : दूरसंचार राज्यमंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बीएएनएलची ४जी सेवा केव्हा लाँच केली जाईल, याची माहिती दिली. 

bsnl to launch 4g all over in india by September 2022 government in parliament | BSNL च्या 4G सेवांच्या लाँचची झाली घोषणा; खासगी कंपन्यांची साथ सोडणार का ग्राहक?

BSNL च्या 4G सेवांच्या लाँचची झाली घोषणा; खासगी कंपन्यांची साथ सोडणार का ग्राहक?

googlenewsNext

BSNL 4G Services : सध्या खासगी क्षेत्रातील सर्वच दूरसंचार कंपन्या ४ जी सेवा पुरवत आहेत. परंतु सरकारच्या अधिपत्याखालील BSNL आणि MTNL या कंपन्या मात्र अद्यापही २जी आणि ३ जी सेवा पुरवत आहेत. अनेकांकडून बीएसएनएल ४ जी सेवांना कधी सुरुवात करणार असाही प्रश्न विचारला जात होता. काही दिवसांपूर्वी खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपन्या एअरटेल (Airtel), व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea), रिलायन्स जिओ (Reliance Jio) या कंपन्यांनी २० ते २५ टक्क्यांपर्यंत आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या. यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यावर रोष व्यक्त करत सोशल मीडियावर बीएसएनएलला साथ देण्याची मागणीही केली होती. 

यादरम्यान, बीएएनएलच्या ४ जी सेवांबद्दल मोठी घोषणा करण्यात आली आहे. बीएसएनएलच्या ४ जी सेवा या सप्टेंबर २०२२ पर्यंत संपूर्ण देशात लाँच करण्यात येणार आहेत. दरम्यान, दूरसंचार राज्यमंत्र्यांनी संसदेत यासंदर्भातील माहिती दिली. तसंच बीएसएनएलला ४ जी सेवांद्वारे ९०० कोटी रूपयांपर्यंतच्या महसूलाची अपेक्षा आहे.

९०० कोटींचा महसूल
बीएसएनएलची ४ जी सेवा ही खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपन्यांसाठी स्पर्धेपेक्षा कमी ठरणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार दूरसंचार राज्यमंत्र्यांना ४जी सेवा रोलआऊट करण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना बीएसएनएलनं सप्टेंबर २०२२ पर्यंतची वेळ ठरवली असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच देशभरात एकत्र ४ जी सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षात बीएसएनएलला ९०० कोटी रूपयांचा महसूल मिळेल, असंही त्यांनी सांगितलं. 

४जी अपग्रेडसाठी मंजुरी
काही दिवसांपूर्वीच ४जी अपग्रेडेशनसाठी नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरीएट (NSCS) ची परवानगी मिळाली आहे. परंतु ४जी साठी नोकियाच्या पार्ट्सना सरकारनं असुरक्षित सांगत ते फेटाळून लावलं. बीएसएनएल पूर्णपणे मेड इन इंडिया पार्ट्सचा वापर करावा अशी सरकारची इच्छा आहे. दरम्यान, सोशल मीडियावर खासगी कंपन्यांबद्दल नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु खरंच हे बीएसएनएलला पाठिंबा देण्यासाठी आहे का हे त्यांची सेवा लाँच झाल्यानंतरच कळणार आहे.

Web Title: bsnl to launch 4g all over in india by September 2022 government in parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.