चर्मकार विकास संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:18 AM2021-07-27T04:18:36+5:302021-07-27T04:18:36+5:30

कारगिल दिनानिमित्त विद्यापीठात व्याख्यान जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षक आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे कारगिल ...

District executive of Charmakar Vikas Sangh announced | चर्मकार विकास संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

चर्मकार विकास संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

Next

कारगिल दिनानिमित्त विद्यापीठात व्याख्यान

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षक आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे कारगिल विजय दिवस निमित्त सोमवारी पुणे येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीतील सेवानिवृत्त प्रा. डॉ. नंदकिशोर कुमार यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी त्यांनी ‘द कारगिल कॉन्फ्लिक्ट: अ लेसन’ या विषयावर १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांनी कारगिल, द्रास बटालिक व तोलेलींग या भारताच्या महत्त्वपूर्ण भागावर अतिक्रमण केल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना या भागातून कशा प्रकारे हुसकावून लावले, याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. सुभाष जाधव यांनी तर मनोगत प्रा. विलास कुमावत यांनी व्यक्त केले. यावेळी कला व विद्या प्रशाळेचे संचालक डॉ. अनिल चिकाटे, डॉ.तुषार रायसिंग, सचिन चव्हाण उपस्थित होते.

रोटरी वेस्टतर्फे `मातोश्री`मध्ये व्याख्यान

जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे मातोश्री आनंदाश्रमातील ज्येष्ठ व्यक्तीसाठी 'उतार वयातील मानसिक आरोग्य व घ्यावयाची काळजी' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मयूर मुठे व आयुर्वेद वैद्य आनंद दशपुत्रे यांनी मार्गदर्शन केले. समकित मुथा व मुनीरा तरवारी यांनी ज्येष्ठ व्यक्तींसाठी विविध खेळांचे आयोजन केले होते. यावेळी सी. ए. स्मिता बंदूकवाला, सुनील सुखवाणी, केतन पोरवाल आणि नितेश मेदासनी यांनी फळांचे वाटप केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष कृष्णकुमार वाणी, मानद सचिव अनुप असावा, चंद्रकांत सतरा, विवेक काबरा, घमेंडीराम सोनी, अमृत मित्तल, गुणवंत नारखेडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार विनीत जोशी यांनी मानले.

रोटरी क्लबतर्फे कुंभारखोरी येथे वृक्षारोपण

जळगाव : येथील रोटरी क्लब जळगावतर्फे कुंभारखोरी येथे अध्यक्ष संदीप शर्मा व जितेंद्र ढाके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. तुषार फिरके, राजेश वेद, डॉ. काजल फिरके, वर्धमान भंडारी, राजू आडवाणी, सुभाष अमळनेरकर, मुकेश महाजन, आसिफ मेमन,ॲड. सागर चित्रे उपस्थित होते.

कारगिल दिनानिमित्त रक्तदान शिबिर

जळगाव : बारा बलुतेदार संघटनेतर्फे कारगिल विजय दिनानिमित्त व संघटनेचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४७ पिशव्य रक्त संकलित करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष किशोर सुर्यवंशी, विभागीय अध्यक्ष मुकुंद मेटकर, महिला अध्यक्षा भारती कुमावत यांच्यासह आदी समाज बांधव उपस्थित होते.

Web Title: District executive of Charmakar Vikas Sangh announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.