Goa Election 2022: बाहेरचा उमेदवार लादल्यास पक्ष सोडणार; गोव्यात काँग्रेस आमदाराने दिला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 10:33 AM2022-01-18T10:33:15+5:302022-01-18T10:34:02+5:30

Goa Election 2022: गोव्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या मतदारसंघात बाहेरील उमेदवार आणून त्याला उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे.

goa election 2022 if an outside candidate is imposed will leave the party goa congress mla gave direct warning | Goa Election 2022: बाहेरचा उमेदवार लादल्यास पक्ष सोडणार; गोव्यात काँग्रेस आमदाराने दिला थेट इशारा

Goa Election 2022: बाहेरचा उमेदवार लादल्यास पक्ष सोडणार; गोव्यात काँग्रेस आमदाराने दिला थेट इशारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पर्वरी : पर्वरी मतदारसंघात भाजपचे  संभाव्य उमेदवार, माजी आमदार रोहन खंवटे यांनी चार दिवसांपूर्वी प्रचारास सुरुवात केली आहे. तृणमूल आणि आम आदमी पक्षाने उमेदवार निश्चित केले आहेत. मात्र, काँग्रेसने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाहेरील उमेदवार आणून त्याला उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, तसे झाल्यास कार्यकर्त्यांसह पक्षातून बाहेर पडू, असा इशारा पेडणेकर यांनी दिला आहे. 

पर्वरीत भाजप, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचार जोरदार सुरू ठेवला आहे. यात भाजपचे उमेदवार प्रचारात आघाडीवर आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत घरोघरी प्रचार करण्यावर अधिक भर दिला आहे. काँग्रेसकडून मतदारसंघात चार-पाच उमेदवार इच्छुक आहेत. दरम्यान, मतदारसंघातून सुकूरचे माजी सरपंच अनिल पेडणेकर यांचे नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहे.
 

Web Title: goa election 2022 if an outside candidate is imposed will leave the party goa congress mla gave direct warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.