गोळी लागल्यावरही आईने बाळाला दिला जन्म, त्यानंतर लगेच सोडले प्राण; वडिलाचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 04:08 PM2022-05-17T16:08:41+5:302022-05-17T16:09:06+5:30

US Crime News : 'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, ज्या प्रेग्नेंट महिलेचा मृत्यू गोळी लागल्याने झाला तिचं नाव एंजेस मॉर्गन हीथर होतं. तर तिच्या पार्टनरचं नाव याहमेल मोंटाज होतं.

US : 7 months pregnant woman shot dead but gave birth to child | गोळी लागल्यावरही आईने बाळाला दिला जन्म, त्यानंतर लगेच सोडले प्राण; वडिलाचाही मृत्यू

गोळी लागल्यावरही आईने बाळाला दिला जन्म, त्यानंतर लगेच सोडले प्राण; वडिलाचाही मृत्यू

Next

US Crime News : प्रेग्नेंट महिला आणि तिच्या होणाऱ्या पतीची हत्या करण्यात आली. मात्र, प्रेग्नेंट महिलेने जीव जाण्याआधी बाळाला जन्म दिला. या बाळाची स्थिती नाजूक आहे. बाळाला गोळी लागली नाही, पण इमरजन्सीमध्ये डिलीव्हरी झाल्याने त्याची जीव धोक्यात आहे. 

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, ज्या प्रेग्नेंट महिलेचा मृत्यू गोळी लागल्याने झाला तिचं नाव एंजेस मॉर्गन हीथर होतं. तर तिच्या पार्टनरचं नाव याहमेल मोंटाज होतं. ही घटना अमेरिकेतील बाल्टीमोरची आहे. एंजेस मॉर्गन हीथर ७ महिन्यांची प्रेग्नेंट होती. गोळी लागल्यानंतर कपलला बाल्टीमोरच्या जॉन्स हॉपकिंस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

बाल्टीमोर पोलीस कमिश्नर मायकल हॅरिसन यांनी सांगितलं की, ही घटना गुरूवार रात्रीची आहे. साधारण ८ वाजता एक कार याहमेलच्या कारच्या समोर येऊन थांबली. यानंतर दुसऱ्या कारमधून ड्रायव्हर बाहेर आला व त्याने फायरिंग केली. यादरम्यान एका दुसऱ्या व्यक्तीने येऊन पॅसेंजर विंडोकडून फायरिंग केली. 

आतापर्यंतच्या चौकशीतून समोर आलं की, या घटनेत दोघांनी फायरिंग केलं. जे अजूनही फरार आहेत. या आरोपींबाबत अजूनही पोलिसांच्या हाती काहीच पुरावे लागलेले नाहीत. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

कमिश्नर म्हणाले की, ज्यांनी कुणी हे केलं त्यांना आम्ही लवकरच अटक करू. तेच याहमेल मोंटाजच्या परिवाराला या घटनेनंतर धक्का बसलाय. मोंटाजचा चुलत भाऊ मिनी म्हणाला की, एक बाळ जगात येणार  होतं, अखेर असं कुणी कसं करू शकतं?
 

Web Title: US : 7 months pregnant woman shot dead but gave birth to child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.