... म्हणून विवाहितेने ७ व्या मजल्यावरुन उडी मारून स्वत:चं आयुष्य संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 08:29 PM2021-08-01T20:29:35+5:302021-08-01T20:40:13+5:30

Suicide Case : एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराने विवाहितेकडे लग्नाचा तगादा लावला आणि सततच्या धमकीमुळे त्रासलेल्या विवाहितेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अहमदनगर येथील भूदरापुरा येथे राहणारे चंदूभाई परमार एका गॅरेजमध्ये काम करतात. त्यांची मुलगी आरती हिचे पाच वर्षांपूर्वी अरावली येथील निवासी विष्णूभाई याच्यासोबत लग्न झालं होतं

आरतीच्या सासरी राहणारा एक तरुण तिचा पती घरी नसताना आरतीला नाहक त्रास देत असे. अनेकदा तो आरतीवर जबरदस्तीही करीत होता. आरती आपला पती आणि मुलांसह अहमदाबाद येथे राहायला आली होती. दोघे आपल्या मुलासह सिंधुभवन रोड येथे राहत होते.

दिनेश याला आरती अहमदाबादमध्ये राहायला गेल्याचं कळताच तो देखील अहमदाबाद येथे आला आणि  वराज येथे भाड्याने घर घेऊन राहू लागला.

काही दिवसांपूर्वी एक तर्फी प्रेम करणारा दिनेश जेव्हा तिथे आला तेव्हा आरती आपल्या वडिलांच्या घरी होती. यानंतर दिनेश तिच्या वडिलांच्या इमारतीखाली गेला व आरतीला खाली बोलावलं. तो आरतीला सोबत येण्यास सांगितले. नाहीतर पती आणि वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली.

जेव्हा तिच्या पतीला याबाबत कळालं, त्यानंतर त्याने आरतीच्या वडिलांना याबाबत सर्व हकीकत कळवली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरतीने ७व्या मजल्यावरुन उडी मारून आपले आयुष्य संपवले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दिनेश याच्याविरोधात आत्महत्येसं प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.