Goa Election Result 2022 : गोव्यात 'कहानी में ट्विस्ट'?; प्रमोद सावंतांच्या CM पदाबाबत विचारताच भाजपा नेते विश्वजीत राणे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 05:03 PM2022-03-10T17:03:50+5:302022-03-10T17:10:30+5:30

Goa Election Result 2022 : गोव्यात भाजपची बहुमताच्या दिशेने सुरू आहे वाटचाल.

Goa Election Results LIVE Updates Its a sensitive question says BJPs Vishwajit Rane on Pramod Sawants CM know what he said | Goa Election Result 2022 : गोव्यात 'कहानी में ट्विस्ट'?; प्रमोद सावंतांच्या CM पदाबाबत विचारताच भाजपा नेते विश्वजीत राणे म्हणाले...

Goa Election Result 2022 : गोव्यात 'कहानी में ट्विस्ट'?; प्रमोद सावंतांच्या CM पदाबाबत विचारताच भाजपा नेते विश्वजीत राणे म्हणाले...

Next

Goa Election Result 2022 : सध्या पाचही राज्यांची मतमोजणी सुरू असून पंजाब वगळता चारही राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. तसंच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचाही या निवडणुकीत विजय झाला आहे. तर विश्वजित राणे यांचाही निवडणुकीत विजय झाला. दरम्यान, आपण मगोप आणि अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू असं वक्तव्य प्रमोद सावंत यांनी केलं. दरम्यान, विश्वजित राणे यांनीदेखील गोव्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप नेते विश्वजित राणे यांना प्रमोद सावंत मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहतील का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी प्रतिक्रिया देत "मला कल्पना नाही, हा एक संवेदनशील प्रश्न आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 
फडणवीसांनी दोघांना दिलं श्रेय
गोव्याचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील विजयाचं श्रेय दोघांना दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना त्यांनी या विजयाचं श्रेय दिलं.. गोव्यात एन्टीइंन्कबन्सीचा परिणाम होईल, भाजपची पिछेहट होईल, असं अनेकांना वाटत होतं. मात्र, गोव्यात भाजपनं मोठं यश मिळवलं. नरेंद्र मोदींनी देशात जो विश्वास तयार केलाय, त्याचा हा परिणाम आहे. त्यासोबतच, प्रमोद सावंत यांनी गोव्यात डबल इंजिननं ज्या पद्धतीनं सरकार चालवलं, त्यामुळे जनतेचा विश्वास संपादन केला. त्यामुळे, या विजयाचं श्रेय नरेंद्र मोदी आणि प्रमोद सावंत यांचंच असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

 

Web Title: Goa Election Results LIVE Updates Its a sensitive question says BJPs Vishwajit Rane on Pramod Sawants CM know what he said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.