Farmer Protest: शेतकरी आंदोलनात निहंगाकडून अजून एका मजुराला बेदम मारहाण, पायही तोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 11:54 AM2021-10-22T11:54:56+5:302021-10-22T11:57:30+5:30

निहंगाने पीडित व्यक्तीकडून फुकट कोंबडी मागितली. त्या व्यक्तीने नकार दिल्यामुळे निहंगाने त्याला बेदम मारहाण करत त्याचा पाय तोडला.

Farmer protest news , In the farmers agitation another laborer was beaten by Nihanga and his leg was broken | Farmer Protest: शेतकरी आंदोलनात निहंगाकडून अजून एका मजुराला बेदम मारहाण, पायही तोडला

Farmer Protest: शेतकरी आंदोलनात निहंगाकडून अजून एका मजुराला बेदम मारहाण, पायही तोडला

Next

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी दिल्ली-हरियाणाच्या सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलनात निहंगांद्वारे एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी काही निहंगांना ताब्यातही घेतलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा निहंगांनी एका व्यक्तीला मारहाण करत त्याचा पाय तोडल्याची घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, निहंगांने मनोज पासवान नावाच्या मजुराला बेदम मारहाण करत त्याचा पाय तोडल्याची घटना घडली आहे. मनोज हा बिहारचा रहिवासी असून, तो अनेक वर्षांपासून मजुरीचे काम करतो. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी निहंगला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, पीडित मनोज पासवान त्याच्या रिक्षातून कोंबड्या घेऊन जात होता, यादरम्यान एका निहंगाने त्याला अडवून फुकट कोंबडी देण्याची मागणी केली. पण, मनोजने नकार दिल्यावर निहंगाने त्याला बेदम मारहाण करत त्याचा पाय तोडला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी मनोजला रुग्णालयात दाखल केलं आणि आरोपीला अटक केलं.

निहंगाकडून लखबीरचा खून
काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी निहंगांनी पंजाबमधील मजूर लखबीर सिंगची निर्घृण हत्या केली होती आणि त्याचा डावा हात आणि एक पाय कापला होता. लखबीरवर निहंगांनी गुरु ग्रंथ साहिबचा अपमान केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी सोनीपत पोलिसांनी सरबजीत, गोविंद, भगवंत आणि नारायण सिंग अटक केली होती.

Read in English

Web Title: Farmer protest news , In the farmers agitation another laborer was beaten by Nihanga and his leg was broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.