नियोजनाअभावी वाशिम जिल्हा परिषदेचा २८.९५ कोटींचा निधी शासनजमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 12:09 PM2021-07-29T12:09:33+5:302021-07-29T12:09:45+5:30

Washim Zilla Parishad : हा निधी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापर्यंत खर्च होणे आवश्यक होते.

Washim Zilla Parishad deposits Rs 28.95 crore due to lack of planning! | नियोजनाअभावी वाशिम जिल्हा परिषदेचा २८.९५ कोटींचा निधी शासनजमा!

नियोजनाअभावी वाशिम जिल्हा परिषदेचा २८.९५ कोटींचा निधी शासनजमा!

Next

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त निधी दोन वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषदेला पूर्णपणे खर्च करता आला नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील १३४.०२ कोटींपैकी २८ कोटी ९५ लाख ३० हजारांचा निधी विहित मुदतीत खर्च न झाल्याने शासनजमा करण्यात आला.
ग्रामीण भागाचे मिनीमंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेला स्वउत्पन्नाबरोबरच शासनाकडून विविध योजनेंतर्गत निधी प्राप्त होतो. हा निधी दोन वर्षाच्या कालावधीत खर्च करणे बंधनकारक आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाकडून जिल्हा परिषदेच्या १० विभागांना १३४.०२ कोटींचा निधी मिळाला. हा निधी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापर्यंत खर्च होणे आवश्यक होते. दोन वर्षाचा कालावधी असतानाही पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी विहीत मुदतीत २८.९५ कोटींचा निधी खर्च होऊ शकला नाही. हा निधी अखर्चित राहिल्याने जिल्हा परिषद प्रशासनाला शासनजमा करावा लागला. एकिकडे ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी मिळत नसल्याची ओरड आहे तर दुसरीकडे शासनाकडून मिळालेला कोट्यवधींचा निधीही विहित मुदतीत खर्च करण्याचे गांभीर्य दाखविले जात नसल्याने ग्रामीण भागाचा विकास खुंटत असल्याचे दिसून येते. 

Web Title: Washim Zilla Parishad deposits Rs 28.95 crore due to lack of planning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.