१६५ प्रवासी बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:46 PM2019-06-02T23:46:07+5:302019-06-02T23:46:58+5:30

औरंगाबाद : पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे रविवारी (दि.२) सायंकाळी अचानक औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाले. ...

165 passengers escape from Balangal | १६५ प्रवासी बालंबाल बचावले

१६५ प्रवासी बालंबाल बचावले

googlenewsNext
ठळक मुद्देगो एअरचे पाटणा-मुंबई विमान : इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, एसीही पडला बंद, चिकलठाणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग




औरंगाबाद : पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे रविवारी (दि.२) सायंकाळी अचानक औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या दोन्ही इंजिनांची गती मंदावली होती. त्यात विमानातील एसीही बंद पडल्याने प्रवाशांचा श्वास गुदमरत होता. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला आणि १६५ प्रवासी बालंबाल बचावले.
गो एअरच्या पाटणा- मुंबई विमानाने रविवारी नेहमीप्रमाणे उड्डाण घेतले. या विमानाने १६५ प्रवासी मुंबईला जात होते. पाटण्याहून टेकआॅफ झाल्यानंतर काहीतरी घडेल, अशी कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती. प्रवासाच्या अर्ध्या मार्गात विमानाच्या दोन्ही इंजिनांची गती कमी-अधिक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यातून विमानात काहीसा कंपही होत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत होता. अशा परिस्थितीत विमानातील एसीही बंद पडला. त्यामुळे प्रवाशांना श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ लागला. विमानातील प्रत्येक प्रवाशाच्या काळजाचा ठोका चुकला होता. अशा सगळ्या परिस्थितीत वैमानिकाने आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला. पाटणा-मुंबई हवाई मार्गात औरंगाबाद आहे. त्यामुळे या विमानाचे औरंगाबादेत आपत्कालीन लँडिंग क रण्याचा निर्णय घेण्यात आला.
चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाला सायंकाळी ५ वाजेच्या सुमाराला गो एअरचे पाटणा- मुंबई विमानाचे आपत्कालीन लँडिंग होणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच विमानतळ प्राधिक रणाने रुग्णवाहिका, डॉक्टर, अग्निशमन विभागाला सतर्क केले. अवघ्या काही मिनिटांतच रुग्णवाहिकांचा ताफा विमानतळावर दाखल झाला. प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढली होती. वैमानिकाने सुरक्षितरीत्या विमान धावपट्टीवर उतरविले आणि विमानतळावरील प्रत्येकाचा जीव भांड्यात पडला. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. विमानाचे लँडिंग झाल्यानंतर प्रवासी विमानातच बसून होते. बºयाच वेळेनंतर प्रवासी विमानातून बाहेर उतरले. विमानतळावरील सुरक्षा हॉलमध्ये प्रवाशांना थांबविण्यात आले.
दोन्ही इंजिनांची गती मंदावली
गो एअरच्या पाटणा-मुंबई विमानाच्या दोन्ही इंजिनांची गती मंदावल्याने विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्यासाठी आपत्कालीन परिस्थितीतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विमानाचे लँडिंग सुरक्षितरीत्या झाले, अशी माहिती चिकलठाणा विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली.
प्रवाशांना उलट्या
विमानातील एसी बंद पडल्यामुळे दोन ते तीन प्रवाशांना उटल्या झाल्या. कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवली नाही. रात्री ८ वाजेपर्यंत प्रवासी विमानतळावरच होते. गो एअरचे पथक औरंगाबादला येऊन विमान दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याबरोबरच अन्य विमान बोलावून प्रवाशांना मुंबईला नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते.

Web Title: 165 passengers escape from Balangal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.