Marathi Jokes: बायकोनं मुलासमोर सांगितलं 'सत्य'; संतापलेला नवरा पडला तोंडावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 11:00 AM2021-12-09T11:00:00+5:302021-12-09T11:00:04+5:30

Marathi Jokes: सत्य किती कटू असतं याची जाणीव नवऱ्याला झाली

Marathi Jokes Wife tells truth to husband in front of child | Marathi Jokes: बायकोनं मुलासमोर सांगितलं 'सत्य'; संतापलेला नवरा पडला तोंडावर

Marathi Jokes: बायकोनं मुलासमोर सांगितलं 'सत्य'; संतापलेला नवरा पडला तोंडावर

Next

एक माणूस थकून भागून घरी आला.. बायकोनं पाण्याचा ग्लास आणून दिला.. तितक्यात मुलगा गुणपत्रिका घेऊन आला..

वडील- विज्ञान- ३९, इंग्रजी ४६, गणित- ४१.. अरे लाज नाही वाटत तुला...? काय अभ्यास करतोस..?

बायको- अहो तुम्ही जरा शांत व्हा..

वडील- तू गप्प बस.. तुझ्याच लाडामुळे बिघडलाय तो.. सतत त्याला पाठिशी घालतेस...

बायको- अहो, जरा ऐका तरी माझं..

वडील- तू शांत राहा.. एक शब्द बोलू नकोस.. वडील कष्ट करतात.. त्याची जराही किंमत नाहीए.. 

बायको- अहो तुम्ही आधी माझं ऐका.. ती त्याची गुणपत्रिका नाहीए... तुमचीच आहे.. सकाळी कपाट साफ करताना मिळाली..

घरात भयाण शांतता...

Web Title: Marathi Jokes Wife tells truth to husband in front of child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.