Taliban Iran: संघर्ष वाढणार! पंजशीरच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करू नये; तालिबानने इराणला ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 01:32 PM2021-09-14T13:32:15+5:302021-09-14T13:33:17+5:30

इराणने दिलेल्या इशाऱ्यावर तालिबानने पलटवार केला असून, पंजशीरच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करू नये, असे ठणकावले आहे.

taliban suhail shaheen warns iran that panjshir is our internal matter do not interfere | Taliban Iran: संघर्ष वाढणार! पंजशीरच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करू नये; तालिबानने इराणला ठणकावले

Taliban Iran: संघर्ष वाढणार! पंजशीरच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करू नये; तालिबानने इराणला ठणकावले

googlenewsNext

काबूल:अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने सरकार स्थापन केले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबत ठोस भूमिका घेण्यात आली नसल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता अमेरिकेने क्वाड परिषदेचे आयोजन केले असून, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दुसरीकडे, सरकार स्थापन केले असले, तरी तालिबानसमोर पंजशीरचे आव्हान अद्याप कायम असल्याचे दिसत आहे. इराणने दिलेल्या इशाऱ्यावर तालिबानने पलटवार केला असून, पंजशीरच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करू नये, असे ठणकावले आहे. (taliban suhail shaheen warns iran that panjshir is our internal matter do not interfere)

PM मोदींचा अमेरिका दौरा ठरला! व्हाइट हाऊसमध्ये घेणार बायडेन यांची भेट

पंजशीर खोऱ्यामध्ये नॅशनल रेझिस्टन्स फोर्स आणि तालिबानींमध्ये जोरदार संघर्ष झाला. तालिबानच्या मदतीसाठी पाकिस्तानच्या हवाई दलाने हवाई हल्लेही केले असल्याचे म्हटले गेले. पंजशीर खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या कारवाईवरून इराणने तालिबानला इशारा देत तालिबानने लक्ष्मण रेषा ओलांडू नये, असे म्हटले होते. पंजशीरमध्ये पाकिस्तानच्या हस्तक्षेपाची इराणने चौकशी सुरू केली आहे. यावरून आता तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने इराणवर पलटवार केला आहे. यामुळे आता इराण आणि तालिबानमधील संघर्ष वाढण्याची चिन्हे असल्याचे बोलले जात आहे. 

Vi साठी ‘या’ बँकांचे मोदी सरकारला साकडे; पुढाकार घेत केली महत्त्वाची मागणी

कोणत्याही देशाने अंतर्गत मुद्यांवर हस्तक्षेप करू नये

पंजशीरचा मुद्दा चर्चेतून सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. मात्र, कोणताही मार्ग नसल्याने सैनिकी कारवाई केली. पंजशीर हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे. अफगाणिस्तानच्या जनतेला स्वतंत्र्य हवे आहे. कोणत्याही देशाने आमच्या अंतर्गत मुद्यांवर हस्तक्षेप करू नये, अशी आमची इच्छा आहे, असे शाहीनने स्पष्ट केले. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या वाढत्या प्रभावाबाबत बोलताना शाहीनने म्हटले की, कोणत्याही देशाचा प्रभाव, भूमिका नाही. शेजारच्या देशासोबत आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यामुळे या शेजारचे देश आणि या क्षेत्रात असणाऱ्या देशांकडून अफगाणिस्तानच्या पुनर्निमाणासाठी सहकार्य हवे आहे. सहकार्याची अपेक्षा करणे म्हणजे त्या देशाचा आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप आहे, असा अर्थ होत नाही. हे आमचे धोरण नाही, असेही शाहीनने सांगितले.

भूपेंद्र पटेलांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पटेल समाजाची नाराजी गुजरातमध्ये दूर होईल? 

दरम्यान, जगासमोर स्वच्छ चेहरा ठेवण्यासाठी तालिबानने मोठा निर्णय घेतला आहे. अफगाण पोलिसांच्या ताब्यात काबूल देण्यात येणार असून तालिबानी दहशतवाद्यांना दुसऱ्या प्रांतात हलविले जाणार आहे. काबूलमध्ये यापुढे वर्दीतील पोलीस दिसणार आहेत. हे पोलीस तेच असतील जे गेल्या सरकारच्या काळात नियुक्त होते. मात्र, या पोलिसांचा आणि तालिबानी दहशतवाद्यांचा गणवेश एकसारखाच असणार आहे. तालिबानचा सांस्कृतिक आयोगाचा सदस्य अनाममुल्लाह समनगनी याने ही माहिती दिली आहे. काबूलच्या नागरिकांनी तालिबानकडे वर्दीतील पोलीस शहराच्या सुरक्षेसाठी तैनात करावेत अशी मागणी केली होती.

Web Title: taliban suhail shaheen warns iran that panjshir is our internal matter do not interfere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.