जेडीच्या मृत्यूने टायगर श्रॉफ भावूक, जाणून घ्या कोण आहे ‘JD’?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 12:15 PM2020-03-15T12:15:08+5:302020-03-15T12:15:55+5:30

टायगरला दुःख अनावर...

tiger shroff sad after his cat jd passes away-ram | जेडीच्या मृत्यूने टायगर श्रॉफ भावूक, जाणून घ्या कोण आहे ‘JD’?

जेडीच्या मृत्यूने टायगर श्रॉफ भावूक, जाणून घ्या कोण आहे ‘JD’?

googlenewsNext
ठळक मुद्देटायगरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास त्याचा ‘बागी 3’ हा सिनेमा जोरदार कमाई करतोय.

टायगर श्रॉफचा ‘बागी 3’ हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे ‘बागी 3’ची अख्खी टीम आनंदात आहे. पण टायगरला मात्र दु:ख अनावर होतेय. होय, जेडीच्या मृत्युमुळे टायगर दु:खी आहे. सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली.
 आता हा जेडी कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर जेडी म्हणजे, टायगरचे लाडके मांजर. होय, या मांजराचा अलीकडे मृत्यू झाला. जेडीच्या मृत्यूनंतर टायगरने एक भावूक पोस्ट शेअर केली.


‘ ईश्वर तुझ्या आत्म्याला शांति देवो. 17 वर्षे एवढे प्रेम आणि आनंद देण्यासाठी तुझे आभार.  तू माझ्या आयुष्यात परत येशील, अशी आशा करतो.  माझ्या आयुष्यात परत येत नाहीस तोपर्यंत जिथेही असशील तिथे खूश राहा. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,’ असे टायगरने या पोस्टमध्ये लिहिले. या पोस्टसोबत टायगरने जेडीचा फोटोही श्ेअर केला आहे.
 टायगरचे त्याच्या या मांजरावर किती प्रेम होते, यावरून याचा अंदाज यावा.


टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास त्याचा ‘बागी 3’ हा सिनेमा जोरदार कमाई करतोय. ‘बागी 3’ केवळ आठ दिवसांत 95.70 कोटी इतकी कमाई केली आहे. या चित्रपटात टायगरशिवाय श्रद्धा कपूर, अंकिता लोखंडे, रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहेत. लवकरच टायगर ‘हिरोपंती 2’मध्ये दिसणार आहे. यात क्रिती सॅनन टायगरच्या अपोझिट दिसेल. हा सिनेमा 2014 मध्ये आलेल्या ‘हिरोपंती’चा सीक्वल आहे. या चित्रपटातून टायगरने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

Web Title: tiger shroff sad after his cat jd passes away-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.