"फडणवीसांची जिरवायची हे नितीन गडकरींनी कानात सांगितलं"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 08:40 AM2021-10-22T08:40:58+5:302021-10-22T08:43:23+5:30

काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट

Nitin Gadkari wanted to teach a lesson to Fadnavis, says Congress leader Vijay Vadettiwar | "फडणवीसांची जिरवायची हे नितीन गडकरींनी कानात सांगितलं"

"फडणवीसांची जिरवायची हे नितीन गडकरींनी कानात सांगितलं"

Next

नांदेड : नागपूरला एकीकडे गडकरी तर दुसरीकडे फडणवीस आहेत. दोघांची तोंडे ३६ आहेत, हे नागपूरकरांना चांगले माहिती आहे. त्यामुळे गडकरींनी आपल्या कानात गुपचूपपणे सांगितले होते, ‘फडणवीसांची जिरवायची होती. बरे झाले जिरली’, असा गौप्यस्फोट मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. 

बुधवारी रात्री देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. वड्डेटीवार म्हणाले, ‘बोलता बोलता त्यांची जिरली. पुन्हा ते जिरवणार आहेत. कुणा-कुणाची जिरते ते पाहाच आता. कारण या देशाची हवा आता बदलली आहे. २०२४ मध्ये केंद्रात मोदी आणि शहा यांचे सरकार दिसणार नाही. कारण त्यांनी पापेच एवढी केली आहेत. महाआघाडीचे सरकार मजबूत असून, हा फेविकॉलचा जोड आहे. त्यामुळे तुम्ही किती ईडी लावा, सीडी लावा; परंतु फेविकॉलचा हा जोड तुटणार नाही.’   

नाव योगी अन् भक्त आसारामचे 
nभाजपच्या अध:पतनाची सुरुवात आगामी उत्तर प्रदेशातील निवडणुकांपासून होणार आहे. नाव योगी अन् सर्व भक्त आसारामचे असे आहे. 
nत्यांचे आता ‘बुरे दिन’ सुरू झाले आहेत. उत्तर प्रदेशात मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांवरून हे सिद्ध होते, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Web Title: Nitin Gadkari wanted to teach a lesson to Fadnavis, says Congress leader Vijay Vadettiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.