ड्रग्ज, अंडरवर्ल्ड अ‍ॅण्ड बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2016 07:08 AM2016-06-20T07:08:40+5:302016-06-20T12:38:40+5:30

इफेड्रीन या इंटरनॅशनल ड्रग्ज रॅकेटमध्ये बॉलिवुड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने ड्रग्ज, अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस ...

Drugs, underworld and Bollywood actress | ड्रग्ज, अंडरवर्ल्ड अ‍ॅण्ड बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस

ड्रग्ज, अंडरवर्ल्ड अ‍ॅण्ड बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस

googlenewsNext
ेड्रीन या इंटरनॅशनल ड्रग्ज रॅकेटमध्ये बॉलिवुड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने ड्रग्ज, अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस हे कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वी देखील जुन्या जमाण्याची मंदाकिनी, मोनिका बेदी यांचे अंडरवर्ल्डं कनेक्शन बॉलिवूडला हादरून सोडणारे होते. मुळात अंडरवर्ल्डला नेहमीच बॉलिवूडचे आकर्षण राहिले आहे. त्यामुळेच अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्ट्यांमध्ये बॉलिवूडचे अनेक तारे-तारका नेहमीच झळकल्या आहेत. आता तर ड्रग्ज रॅकेटमध्येही ममता कुलकर्णीचा सहभाग असल्याचे समोर आल्याने पुन्हा एकदा बॉलिवुड आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन चर्चेचा विषय ठरत आहे... 
 
ममता कुलकर्णी - विक्की गोस्वामी
९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपल्या सौदर्याच्या अदानी घायाळ करणाºया अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचे व्यक्तीगत आयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. खरं तर ममता बॉलिवूडमधील एकेकाळची टॉपची अभिनेत्री होती. मात्र तिचे नाव नेहमीच अंडरवर्ल्डशी जोडले गेल्याने तिच्या बॉलिवूड कारकिर्दीचा ग्राफही तेवढ्याच वेगाने खाली उतरला. १९९३ मध्ये ममताने स्टारडस्ट मॅगझीनसाठी टॉपलेस फोटोशुट करून एकच खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी तिच्यावर टीकाही करण्यात आली  होती. त्यानंतर तिचे नाव नाव एकेकाळचा दाऊदचा राइट हॅण्ड छोटा राजनशी जोडले गेले. त्याच्या सांगण्यानुसारच ममताला ‘चायना गेट’ या चित्रपटात राजकुमार संतोषी यांनी संधी दिल्याची चर्चा होती. त्यानंतर ती ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामी याच्या संपर्कात आली अन् बॉलिवूडशी जणू काही तिचे नातेच संपुष्टात आले. पुढे १९९७ मध्ये तिने दुंबई येथे विक्की गोस्वामी याच्याशी लग्नही केले. त्यानंतर ती साध्वी बनली अन् ‘योगिनी’ नावाचे पुस्तकही प्रकाशित केले. याच दरम्यान तिला व पती विक्की गोस्वामीला केनियात अटक करण्यात आली होती. पुढे ममताला सोडण्यातही आले. तिने तब्बल बारा वर्ष विक्कीची केस लढली. मात्र ठाणे पोलिसांनी एप्रिलमध्ये सोलापूूर एमआयडीसीतील एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीवर छापा टाकून जवळपास साडेवीस टन इफेड्रीन पावडरचा साठा जप्त केला. यासंपुर्ण इंटरनॅशनल रॅकेटमागे ममता कुलकर्णीचा सहभाग असल्याचे आता उघड झाल्याने पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. 


 
मंदाकिनी - दाऊद इब्राहिम
राजकपूरची हॉट आणि सेक्सी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाºया मंदाकिनीने ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात केलेल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केले. तिच्या या अभिनयाची मोहीनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर देखील पडली. दाऊदला मंदाकिनीच्या सौदर्याने ऐवढे घायाळ केले की, तो तिला गओदर पाकिस्तान आणि नंतर दुंबईला घेवून गेला. मात्र यामुळे मंदाकिनीचे फिल्मी करीअर पुर्णपणे संपुष्टात आले. शिवाय तिला अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची प्रियसी असल्याचा कलंकही सहन करावा लागला. त्यामुळे ती बराच कालावधी मीडियापासून दूर होती. ती नेहमीच दाऊदसोबतच्या संबंधाला मैत्रिची जोड देत होती. मात्र दाऊदसोबत तिचा वावर संशय निर्माण करणारा होती. बºयाचदा ती त्याच्या बंगल्यावरच राहायची. क्रिकेट बघतानाचे दोघांचे फोटो आजही लोकांच्या स्मरणात आहेत. 



 
मोनिका बेदी - अबु सालेम
अभिनेत्री मोनिका बेदी देखील अंडरवर्ल्ड डॉन अबु सालेम याच्या घेºयात आली. ज्यामुळे तिचे बॉलिवूड करीअरच संपुष्टात आले. बॉलिवूडमधून अचानक गायब झालेल्या मोनिकाला जेव्हा सालेमसोबत बॅँकॉकमध्ये अटक केल्याच्या बातम्या आल्या, तेव्हा तिच्या गायब होण्यामागचे कारण उलगडत गेले. असे म्हटले जात आहे की, जेव्हा मोनिकाने बॉलिवूड पर्दापन केले तेव्हाच सालेमचे तिच्यावर प्रेम जडले होते. सालेमनेच तिला बॉलिवूडमध्ये सेटल करण्यासाठी निर्मार्त्यांकडे शिफारशी केल्या होत्या. त्यामुळे मोनिकाला काही चित्रपटांमध्ये कामही मिळाले. काही वर्षानंतर सालेमने बॅँकॉकमध्ये स्वत:चे बस्तान बसविले. पुढे मोनिकालाही बॅँकॉकला बोलावून घेतले. मात्र खोट्या पासपोर्टच्या आरोपाखाली मोनिकाला बॅँकॉकमध्ये काही वर्ष तरुंगात काढावे लागले. त्यानंतर या दोघानाही भारतात आणण्यात आले. भारतात तीन वर्ष शिक्षा भोगल्यानंतर मोनिका सध्या टीव्ही सीरियलमध्ये काम करीत आहे. तर सालेम अजूनही तरुंगातच आहे. 


 
सोना - हाजी मस्तान
मुंबई अंडरवर्ल्डचा रॉबिन हुड हाजी मस्तान देखील बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेसचा दिवाना होता. त्यातही तो मधुबालावर अक्षरश: फिदा होता. मधुबालाचा तो ऐवढा फॅन होता की, तिच्यासाठी तो काहीपण करायला तयार होता. मात्र मधुबालाशी जवळीकता साधणे हे कठीण बाब असल्याने त्याने मधुबालासारख्याच हुबेहुब दिसणाºया एका सोना नावाच्या अ‍ॅक्ट्रेसशी विवाह केला. सोना हिला बॉलीवुडमध्ये स्थिर व्हायचे होते. ती एक स्ट्रगल अ‍ॅक्टर म्हणून प्रयत्न करीत होती. पहिल्याच भेटीत हाजी मस्तानने तिला लग्नाची मागणी घातली. सोना सध्या मुंबईत राहात असून ती भोजपुरी चित्रपटांची निर्माती आहे. 


 
अनिता-दाऊद इब्राहिम
९० च्या दशकात पाकिस्तानी अभिनेत्री अनिता आयूब बॉलिवूडमध्ये नशिब आजमावण्यासाठी आली होती. तिने प्यार का तराना, गँगस्टरसारख्या देवआनंद यांनी दिग्दर्शित केलेल्याचित्रपटात काम केले होते. दाऊदला अनिता ऐवढी पसंत आली की, तो तिच्यासाठी बॉलिवूडमध्ये पुन्हा सक्रीय झाला. त्यामुळे अनिताच्या दुबई वाºया सुरू झाल्या. अनिताला घेवून दाऊद ऐवढा पजेसिव्ह होता की, जेव्हा निर्माता जावेद सिद्दकी यांनी अनिताला त्यांच्या चित्रपटात घेण्यास नकार दिला तेव्हा दाऊदने त्यांना गोळ्या झाडून ठार केले. मात्र या प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये अनिताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. तिला बॉलिवूडमधील दरवाजे जवळपास बंद झाले. पुढे ती पाकिस्तानात परत गेली. आता अनिता कुठे आहे हे कोणालाच माहित नाही. 


 

Web Title: Drugs, underworld and Bollywood actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.