Paralympics 2020 : ३९ वर्षीय नेमबाज अधाना सिंघराज यांनी भारताला जिंकून दिलं पदक, चीन खेळाडूंना दिली कडवी टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 11:44 AM2021-08-31T11:44:33+5:302021-08-31T11:44:49+5:30

Paralympics 2020 : भारताचा नेमबाज अधाना सिंगराज यानं मंगळवारी कांस्यपदकाची कमाई केली.

Haryana shooter Adhana Singhraj wins the bronze medal in the men’s 10m air pistol SH1 event in Tokyo Paralympics 2020 | Paralympics 2020 : ३९ वर्षीय नेमबाज अधाना सिंघराज यांनी भारताला जिंकून दिलं पदक, चीन खेळाडूंना दिली कडवी टक्कर!

Paralympics 2020 : ३९ वर्षीय नेमबाज अधाना सिंघराज यांनी भारताला जिंकून दिलं पदक, चीन खेळाडूंना दिली कडवी टक्कर!

Next

Paralympics 2020 : भारताचा नेमबाज अधाना सिंगराज यानं मंगळवारी कांस्यपदकाची कमाई केली. टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजी १० मीटर एअर पिस्तुल SH1 गटाच्या अंतिम फेरीत चिनी खेळाडूंना कडवी टक्कर दिले. अखेरच्या फेरीत जबरदस्त कमबॅक करताना सिंगराजनं २१६.८ गुणांसह कांस्यपदक निश्चित केलं. भारताच्या खात्यात आता २ सुवर्ण, ४ रौप्य व २ कांस्यपदकांसह ८ पदकं झाली आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. ( India's Singhraj bagged the bronze medal in shooting P1 men's 10m air pistol SH1 final at the Tokyo Paralympics)
 


महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल SH1 गटात वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर रुबिना फ्रान्सिसला अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. भारतासाठी हा मोठा धक्का होता. महिलांच्या गोळाफेक F34 फायनलमध्ये भाग्यश्री जाधवला ७व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तीनं ७ मीटर लांब गोळाफेक करून सर्वोत्तमक वैयक्तिक कामगिरी केली.  


सोमवारचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. नेमबाज अवनी लेखरा व भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी सुवर्णपदक पटकावले, तर  देवेंद्र झझारियाने भालाफेकीत तसेच योगेश कथुनिया याने थाळीफेकीत रौप्य पदक जिंकले. सुंदरसिंग गुर्जर कांस्यचा मानकरी ठरला.  

Web Title: Haryana shooter Adhana Singhraj wins the bronze medal in the men’s 10m air pistol SH1 event in Tokyo Paralympics 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.