Maharashtra Bandh: बंदमुळे TMT चं १८ लाखांचे नुकसान; राजकीय दबावामुळे बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 03:35 PM2021-10-11T15:35:05+5:302021-10-11T15:35:49+5:30

केवळ राजकीय दबाव असल्याने कर्मचारी देखील सेवेत दाखल झाले नाही. काही कर्मचारी सकाळच्या सत्रत डेपोत आले होते.

Maharashtra Bandh: TMT loses Rs 18 lakh due to bandh; Closed due to political pressure | Maharashtra Bandh: बंदमुळे TMT चं १८ लाखांचे नुकसान; राजकीय दबावामुळे बंद

Maharashtra Bandh: बंदमुळे TMT चं १८ लाखांचे नुकसान; राजकीय दबावामुळे बंद

googlenewsNext

ठाणे  : लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सोमवारी ठाणो परिवहन सेवेची एकही बस रस्त्यावर उतरली नाही. राजकीय दबावामुळे बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या नसल्याचे परिवहनच्या सुत्रंकडून सांगण्यात आले. परंतु कोरोनामुळे आधीच टिएमटीला उतरती कळा लागली आहे. त्यात एक दिवसाच्या बंदमुळे परिवहनला सुमारे १८ लाखांचा तोटा सहन करावा लागला असल्याची बाब समोर आली आहे.

लखीमपुरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. त्यानुसार एसटीची सेवा सुरळीतपणो सुरु असल्याचे दिसून आले. परंतु दुसरीकडे ठाणे परिवहन सेवेची एकही बस रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सॅटीसवर सकाळच्या सत्रत प्रवाशांचे तसेच कामाला जाणा:या चाकरमान्यांचे हाल झाल्याचे दिसून आले. आधीच परिवहन कोरोनामुळे तोटय़ात गेलेली आहे. १०० हून अधिक बसेस आजही किरकोळ दुरुस्तीसाठी आगारात धुळ खात पडून आहेत, त्यातही उत्पन्नावर देखील परिणाम झालेला आहे. असे असतांना सोमवारच्या बंदमुळे देखील परिवहनला तब्बल १८ लाखांच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे.

केवळ राजकीय दबाव असल्याने कर्मचारी देखील सेवेत दाखल झाले नाही. काही कर्मचारी सकाळच्या सत्रत डेपोत आले होते. परंतु त्यांनी देखील काम करण्यास नकार दिल्याचे दिसून आले. त्यामुळे रोज रस्त्यावर उतरणाऱ्या २५० पैकी एकही बस रस्त्यावर उतरु शकली नाही.

कर्मचाऱ्यांचा पगार कापणार
बंदमध्ये सहभागी होऊ नका असे आवाहन परिवहन मार्फत कर्मचा:यांना करण्यात आले होते. परंतु तरी देखील या बंदमध्ये कर्मचारी सहभागी झाल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन किंवा एक दिवसाची रजा दाखविली जाणार असल्याचे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Maharashtra Bandh: TMT loses Rs 18 lakh due to bandh; Closed due to political pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.