‘सेक्रेड गेम्स’ फेम कुब्रा सैतच्या या फोटोंवर व्हाल फिदा, बोल्ड आहेत अदा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 04:41 PM2020-05-25T16:41:52+5:302020-05-25T17:05:53+5:30

‘सेक्रेड गेम्स’ची कुक्कू ख-या आयुष्यातही आहे तितकीच बिनधास्त, बोल्ड

भारताची पहिली ओरिजनल नेटफ्लिक्स सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ प्रचंड गाजली. तितकीच या वेबसीरिजमधील कुक्कूही गाजली. होय, आम्ही बोलतोय ते कुक्कूची भूमिका साकारणारी अभिनेत्री कुब्रा सैत हिच्याबद्दल.

अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीने दिग्दर्शित केलेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे आणि कुब्रा सैत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पण सर्वाधिक चर्चा झाली ती, कुब्राने साकारलेल्या भूमिकेची.

कुब्राने या सीरिजमध्ये कुक्कू नावाच्या तृतीयपंथियाची भूमिका साकारली आहे.

कुब्राने ही भूमिका इतकी प्रभावीपणे पडद्यावर साकारली की, लोक तिला खरोखरचं तृतीयपंथी समजू लागले होते़ म्हणूनच तू तृतीयपंथी आहेस का? असा प्रश्न तिला अनेक मुलाखतीत विचारण्यात आला.

एका मुलाखतीत कुब्रा यावर बोलली. तू तृतीयपंथी आहेस का? असा प्रश्न मला विचारला जातो. हा प्रश्न मला माझी प्रशंसा केल्यासारखा वाटतो. मी माझ्या तृतीयपंथियाच्या भूमिकेत इतका जीव ओतला की, लोक ते खरे मानायला लागले. हीच माझ्या कामाची पावती आहे, असे कुबरा म्हणाली होती.

कुब्रा हिने सुल्तान, रेडी, सिटी आॅफ लाइट अशा अनेक सिनेमांत काम केलेय

‘सेक्रेड गेम्स’मध्ये कुब्राने न्यूड सीन दिला होता. यावरही ती बोलली होती.

‘सेक्रेड गेम्स’मधील भूमिका साकारणे सोपे नव्हते. यातील न्यूड सीन साकारताना मी इतके नर्व्हस झाले होते की मला तो जमेना. अनुरागने मलाव्हिस्की दिली आणि त्यानंतर कुठे मी हा सीन दिला, असे तिने सांगितले होते.

कुब्रा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.

सोशल मीडियावर स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करण्यात ती जराही कचरत नाही.