अंबाजोगाईत खराब रस्त्यामुळे जीप पलटी; दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:22 AM2018-01-20T00:22:54+5:302018-01-20T00:25:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : खराब रस्त्यामुळे जीप पलटी झाल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री १०.३० च्या ...

Jeep overturned due to bad road in Ambajogai; Both injured | अंबाजोगाईत खराब रस्त्यामुळे जीप पलटी; दोघे जखमी

अंबाजोगाईत खराब रस्त्यामुळे जीप पलटी; दोघे जखमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : खराब रस्त्यामुळे जीप पलटी झाल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास सोमनाथ बोरगाव रस्त्यावर घडली. यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गुरुवारी रात्री सोमनाथ बोरगाव येथील ज्ञानेश्वर भिसे व हिवरा खुर्द येथील युवराज गिराम हे जीपने (एम. एच. २० बी. एन. ५५२३) अंबाजोगाईकडे येत होते. अंकुर फाट्याशेजारी असलेल्या वीटभट्टीजवळ जीप आली असता ती रस्त्याच्या खाली जावून पलटी झाली. यात ज्ञानेश्वर भिसे यांच्या डोक्याला चार टाके पडले तर युवराज गिराम यांना मुका मार लागला आहे.

लोखंडीसावरगाव ते आपेगाव हा रस्त्याची दयनीय अवस्था झाल असून, वारंवार या रस्त्यावर अपघात घडत आहेत. झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागास याचे काहीही देणे घेणे नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

Web Title: Jeep overturned due to bad road in Ambajogai; Both injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.