केडीएमसी हद्दीतील रेल्वे स्थानकांवर 2506 नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 05:58 PM2021-08-11T17:58:45+5:302021-08-11T17:58:57+5:30

आज सकाळी 7  वाजता महापालिका क्षेत्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर महापालिकेचे कर्मचारी हजर होते.

Verification of vaccination certificates of 2506 citizens at railway stations in KDMC | केडीएमसी हद्दीतील रेल्वे स्थानकांवर 2506 नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी  

केडीएमसी हद्दीतील रेल्वे स्थानकांवर 2506 नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी  

Next

कल्याण- शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कोविड लसीकरणाचे 2 डोस पूर्ण होऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. या नागरिकांना रेल्वे पास मिळणे सुकर व्हावे याकरीता त्यांचे कोविड लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरीता महापालिका कार्यक्षेत्रात कल्याण, डोंबिवली, कोपर, टिटवाळा, आंबीवली, शहाड,ठाकुर्ली या रेल्वे स्थानकांवर महापालिकेने सकाळी  7 ते दुपारी व दुपारी 3  ते रात्री 11 या दोन सत्रात महापालिका कर्मचा-यांचे मदत कक्ष उभारण्यात आले आहेत.

आज सकाळी 7  वाजता महापालिका क्षेत्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर महापालिकेचे कर्मचारी हजर होते. या पहिल्या सत्रात कल्याण पूर्व रेल्वे स्थानक येथे 168, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक येथे 285, डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक येथे 827, डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक येथे 607, ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर 199, शहाड रेल्वे स्थानकावर 15, आंबिवली रेल्वे स्थानकावर 51, कोपर रेल्वे स्थानकावर 150, टिटवाळा रेल्वे स्थानकावर 204  अशा एकुण 2506 नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी  करण्यात आली. दुपारच्या दुस-या सत्रातही नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी केली जात आहे. नागरिकांनी सदर पडताळणीसाठी गर्दी न करता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात  आले आहे.

Web Title: Verification of vaccination certificates of 2506 citizens at railway stations in KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.