India Pakistan, Asia Cup 2023: भारत देणार पाकिस्तानला 'जोर का झटका'? Jay Shah नी आखलेला BCCIचा 'मास्टर प्लॅन' बिघडवणार पाकचं गणित

BCCI च्या एका निर्णयामुळे पाकिस्तानला तातडीची बैठक बोलवावी लागली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 09:24 AM2023-02-04T09:24:16+5:302023-02-04T09:24:46+5:30

whatsapp join usJoin us
India ready to punch big blow to Pakistan over Asia Cup 2023 hosting issue PCB slams BCCI Jay Shah | India Pakistan, Asia Cup 2023: भारत देणार पाकिस्तानला 'जोर का झटका'? Jay Shah नी आखलेला BCCIचा 'मास्टर प्लॅन' बिघडवणार पाकचं गणित

India Pakistan, Asia Cup 2023: भारत देणार पाकिस्तानला 'जोर का झटका'? Jay Shah नी आखलेला BCCIचा 'मास्टर प्लॅन' बिघडवणार पाकचं गणित

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Pakistan, Asia Cup 2023: पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या आशिया कप 2023 संदर्भात आज आशियाई क्रिकेट परिषदेची (ACC) एक महत्त्वाची तातडीची बैठक होणार आहे. खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ही बैठक बोलावली आहे. ही बैठक बहारीनमध्ये होणार असून त्यात ACC चे अध्यक्ष जय शाह यांचाही सहभाग असणार आहे. आशिया कप या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात आयोजित केला जाणार आहे. याबाबत, टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आज भारतामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

आशिया कपची जागा बदलण्याची शक्यता

BCCI च्या सूत्रांच्या माहितीनुसार, जय शाह यांची ही भूमिका अजूनही कायम आहे. अशा स्थितीत पाकिस्तानकडून आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद हिसकावून घेतले जाण्याचा धोका आहे. म्हणूनच पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत सुरू असलेल्या गोंधळाबाबत ही बैठक बोलावली आहे. BCCI च्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, आशिया चषक पाकिस्तानात होण्याची शक्यता फारच कमी आहे. अशा परिस्थितीत ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित केली जाऊ शकते. असे झाल्यास आशिया चषक यूएईमध्ये हलविला जाऊ शकतो. किंवा श्रीलंका हा दुसरा पर्याय आहे. असे झाले तरच दोन्ही स्थितीत पाकिस्तान आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद राखणार आहे.

पाकिस्तान दौऱ्याबाबत सरकारकडून मंजुरी नाही!

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले, "जय शाह आधीच एसीसी बैठकीसाठी बहारीनमध्ये उपस्थित आहेत. BCCI आपल्या निर्णयावर ठाम आहे. आम्ही पाकिस्तान दौऱ्यावर अजिबात जाणार नाही, कारण यासाठी आम्हाला अद्याप सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. अलीकडे, जय शाह यांनी ACC अध्यक्ष म्हणून, पुढील दोन वर्षांसाठी (२०२३-२४) आशियाई क्रिकेटचे वेळापत्रक देखील प्रसिद्ध केले होते. ज्यामध्ये आशिया कपचा देखील समावेश होता. या दरम्यान आशिया कपच्या तारखा आणि ठिकाणे जाहीर करण्यात आली नव्हती.

पाक बोर्डाचे अध्यक्ष काय बोलणार?

"जेव्हा आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धा येते तेव्हा BCCI अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अखेर आम्हाला आता ACC च्या अधिकृत बैठकीची तारीख मिळाली आहे. मी ४ फेब्रुवारी रोजी बहरीन येथे ACC बैठकीला उपस्थित राहीन. मी आता माझी भूमिका सांगू शकणार नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि बैठकीतच आमची भूमिका सांगू. पाकिस्तान संघाने भारत दौऱ्यावर यावे अशी बीसीसीआयची इच्छा आहे. पण टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळावे अशी बीसीसीआयची इच्छा नाही. ही आमच्यासाठी नवीन गोष्टही नाही. अशा परिस्थितीत आम्ही काय करावे, काय निर्णय घ्यावा, हे मी बैठकीनंतरच सांगू शकेन," असे बैठकीबाबत बोलताना नजम सेठी यांनी आधीच सांगितले.

Web Title: India ready to punch big blow to Pakistan over Asia Cup 2023 hosting issue PCB slams BCCI Jay Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.