भाईचा बड्डे हाय! बस स्टॉपवर झळकला गँगस्टरच्या वाढदिवसाचा बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 05:10 PM2021-07-28T17:10:14+5:302021-07-28T17:10:50+5:30

Gangster's birthday banner flashed :या बेकायदेशीर बॅनरवर केडीएमसी प्रशासनाकडून कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे.  

Gangster's birthday banner flashed at the bus stop in kalyan | भाईचा बड्डे हाय! बस स्टॉपवर झळकला गँगस्टरच्या वाढदिवसाचा बॅनर

भाईचा बड्डे हाय! बस स्टॉपवर झळकला गँगस्टरच्या वाढदिवसाचा बॅनर

Next
ठळक मुद्दे नन्नू शहा याच्या विरोधात देशभरात विविध ठिकाणी गंभीर स्वरुपाचे 15 गुन्हे दाखल आहे. त्यात खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण या सारखे विविध गंभीर गुन्हे आहे.

कल्याण - कुख्यात गँगस्टार नन्नू शहा याच्या वाढदिवसाचे बॅनर शहरात झळकले आहे. विशेष म्हणजे केडीएमटीच्या बस स्टॉपवरही शहाच्या वाढदिवसाचा बॅनर झळकला आहे. या बेकायदेशीर बॅनरवर केडीएमसी प्रशासनाकडून कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे.

 
शहराच अनेक ठिकाणी शहा याच्या वाढदिवसाचे बॅनर त्याच्या चाहत्यांनी लावले आहेत. कल्याणमध्ये भाईचा बड्डे जोरात असल्याचे दिसून येत आहे. भाईच्या वाढदिवसाचा बॅनर शहराच चर्चेचा विषय बनला आहे. नन्नू शहा याच्या विरोधात देशभरात विविध ठिकाणी गंभीर स्वरुपाचे 15 गुन्हे दाखल आहे. त्यात खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण या सारखे विविध गंभीर गुन्हे आहे. गेल्याच वर्षी शहा याचा मित्र मटका किंग जिग्नेश ठक्कर याची हत्या गोळया घालून गेली होती. या हत्येच्या आरोपाखाली शहा जेलमध्ये अंडर ट्रायल आहे. त्याच्या वाढदिवसाचा बॅनर बिर्ला कॉलेजच्या केडीएमटीच्या बस स्टॉपवर झळकला आहे.

या बेकायदा बॅनर प्रकरणी महापालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हा विषय त्यांच्याशी संबंधीत नसून केडीएमटीचे उपायुक्त दीपक सावंत यांच्याकडे हा विषय आहे. याविषयी केडीएमटीचे उपायुक्त सावंत यांच्याकडे विचारणा केली असता याविषयी मी काही अधिक बोलू शकत नाही असे सांगून माहिती घेऊन कारवाई केली जाईल. सावंत यांनी प्रभाग अधिकारी कारवाई करतील असे स्पष्ट केले आहे. प्रभाग अधिका:यांकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या प्रभागात एकच बॅनर लावला होता. त्याठिकाणचा बॅनर काढण्याची कारवाई केली जाईल. मात्र अन्य ठिकाणीही बॅनर आहे. ते त्यांच्या हद्दीत नसल्याचे सांगत हात वरती केले आहेत.

Web Title: Gangster's birthday banner flashed at the bus stop in kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.