पुढील ५ दिवस विदर्भात उष्णतेची लाट येणार; हवामान खात्यानं वर्तवली शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 05:46 PM2022-04-28T17:46:32+5:302022-04-28T17:46:42+5:30

कोकण वगळता राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरी ४३ अंशावर होते.

Heat wave in Vidarbha for next 5 days; Possibility of meteorological department | पुढील ५ दिवस विदर्भात उष्णतेची लाट येणार; हवामान खात्यानं वर्तवली शक्यता

पुढील ५ दिवस विदर्भात उष्णतेची लाट येणार; हवामान खात्यानं वर्तवली शक्यता

googlenewsNext

पुढील ५ दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. या काळात ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत विदर्भातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे.

कोकण वगळता राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरी ४३ अंशावर होते. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४५.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. मार्च महिन्यापासून राज्यातील उष्णतेचा पारा कायमच वाढत आहे. कधी उन्हाच्या झळा तर कधी अवकाळी पाऊस, यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

नागपूरमध्ये गेल्या दोन दिवसांत पाच जणांचा उष्माघाताने मृत्यू ओढवला आहे. बुधवारी ३५वर्षीय व ३०वर्षीय युवक वेगवेगळ्य़ा ठिकाणी बेशुद्धावस्थेत आढळले. रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. दोघांचीही ओळख पटलेली नाही. यापूर्वी मंगळवारी तिघांचाही याच पद्धतीने उष्माघाताने मृत्यू झाला होता.

Web Title: Heat wave in Vidarbha for next 5 days; Possibility of meteorological department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.