Pune Crime: एक महिन्याच्या व्याजाचे पैसे न दिल्याने पुलावर बोलावून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 01:13 PM2021-11-29T13:13:49+5:302021-11-29T13:13:55+5:30

व्याज दरमहा देण्याचे ठरले होते. मात्र नोव्हेंबर महिन्याचे व्याज त्याने दिले नव्हते

murder by calling on bridge for non payment of one month interest | Pune Crime: एक महिन्याच्या व्याजाचे पैसे न दिल्याने पुलावर बोलावून केला खून

Pune Crime: एक महिन्याच्या व्याजाचे पैसे न दिल्याने पुलावर बोलावून केला खून

Next

धनकवडी : व्याजाने घेतलेल्या पैशाचे व्याज दिले नाही याचा राग धरून धारदार हत्याराच्या साह्याने वार करून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. ही घटना कात्रज नवले ब्रीज दरम्यान सेवा रस्त्यावर रविवारी रात्री ११.३० वाजता घडली. शरद शिवाजी आवारे,( वय ४३ वर्षे, रा. संभाजीनगर, धनकवडी ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

या प्रकरणी प्रशांत महादेव कदम, (वय ३१वर्षे रा. धनकवडी) यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन प्रकाश शिंदे सह एका अनोळखी व्यक्ती विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद आवारे याने प्रकाश शिंदे याच्या कडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याचे व्याज दरमहा देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे शरद आवारे दरमहा व्याज देत होता. मात्र नोव्हेंबर महिन्याचे व्याज त्याने दिले नाही. म्हणून प्रकाश शिंदे याने शरद ला कात्रज नवले ब्रीज दरम्यान सेवा रस्त्यावरील चंद्रसखा वेअर हाऊस जवळ बोलावले होते. यावेळी दोघांमध्ये वादविवाद झाला आणि चिडलेल्या प्रकाश शिंदे आणि त्याच्या साथीदाराने धारदार हत्याराने शरद वर वार करून पळून गेले. जखमी अवस्थेत शरद आवारे ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपासणी अंती डाँक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान खबर मिळताच उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन टोपे (कोथरूड विभाग) वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक, संगिता यादव, विजय पुराणिक, पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे, अंकुश कर्चे यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

Web Title: murder by calling on bridge for non payment of one month interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.