अंतराळात दिसला देवाचा हात, NASA ने सांगितले वैज्ञानिक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 04:29 PM2021-09-27T16:29:50+5:302021-09-27T16:30:07+5:30

Hand of God: ही आकृती सुमारे 1700 वर्षांपूर्वी सुपरनोव्हा स्फोटानंतर तयार झाल्याचा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.

God's hand appeared in space, NASA said scientific reason | अंतराळात दिसला देवाचा हात, NASA ने सांगितले वैज्ञानिक कारण

अंतराळात दिसला देवाचा हात, NASA ने सांगितले वैज्ञानिक कारण

Next

नवी दिल्ली: अवकाशातील रहस्यांनी नेहमीच सर्वांना भुरळ घातली आहे. यासंदर्भात अनेक शोध आणि खुलासे झाले आहेत, ज्यामुळे सामान्य लोकांना अंतराळाबद्दल अचूक माहिती मिळत असते. आता अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने असा एक फोटो शेअर केला आहे. नासाने अंतराळातील 'नेब्युला ऑफ एनर्जी'चा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अवकाशात मानवी असल्यासारखा दिसत आहे. हा फोटो पाहून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल.

फोटोचे सत्य काय आहे?

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत नासाने लिहिले की, या चित्रात सोन्यासारखा दिसणारा हाताचा आकार ऊर्जेचा एक निहारिका आहे, जो तारा कोसळल्यानंतर शिल्लक राहतो. पीएसआर बी 1509-58 म्हणून ओळखला जाणारा पल्सर हे त्यातून पसरलेले कण आहेत आणि त्यांचा व्यास सुमारे 19 किलोमीटर आहे. पृथ्वीपासून याचे अंतर सुमारे 17 हजार प्रकाश वर्षे आहे.

नासाने प्रसिद्ध केलेला फोटो दोन-तीन वर्षांपूर्वीचा आहे. पण, आता अवकाशात दिसणारा हा आकार कमी ढगांमुळे हळूहळू नाहीसा होत आहे. याबद्दल नासाकडून अधिकाधिक माहिती गोळा केली जात आहे. दरम्यान, नासाने सांगिल्यानुसार, या निहारिकेला 'हँड ऑफ गॉड' म्हणून देखील ओळखली जाते.

1700 वर्षांपूर्वीची आकृती

अंतराळात, हा आकार 33 प्रकाश वर्षांच्या प्रदेशात पसरलेला आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या निहारिकेचा प्रकाश सुमारे 1700 वर्षांपूर्वी सुपरनोव्हा स्फोटानंतर पृथ्वीवर पोहोचला. नासाने सुमारे 15 वर्षांपूर्वी याचा अभ्यास सुरू केला होता आणि तेव्हापासून त्याचे फोटो सतत प्रसिद्ध केले जात आहेत. मागील फोटोंवरुन हे स्पष्ट आहे की निहारिकाच्या ढगांची घनता सतत कमी होत आहे, ज्यामुळे हा आकार अस्पष्ट होत आहे.

Web Title: God's hand appeared in space, NASA said scientific reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.