धक्कादायक! महिला प्रेयसीसोबत मिळून आईने केली मुलीची हत्या, पायांनी चिरडून घेतला तिचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 01:26 PM2021-10-22T13:26:52+5:302021-10-22T13:30:07+5:30

UK : 'द सन यूके'च्या वृत्तानुसार, २० वर्षीय फेंकी स्मिथ आणि २८ वर्षीय सवाना ब्रॉकहिल एकत्र राहत होत्या. त्यांच्यासोबत स्मिथची १६ महिन्यांची मुलगी स्टार हॉब्सनही होती. 

UK : Mother and her female lover killed 16 month old daughter | धक्कादायक! महिला प्रेयसीसोबत मिळून आईने केली मुलीची हत्या, पायांनी चिरडून घेतला तिचा जीव

धक्कादायक! महिला प्रेयसीसोबत मिळून आईने केली मुलीची हत्या, पायांनी चिरडून घेतला तिचा जीव

googlenewsNext

ब्रिटनमद्ये (UK Crime News) एका आईवर आपल्याच १६ महिन्याच्या मुलीच्या हत्येचा आरोप लावला गेला आहे. मुलीच्या आईसोबत आईची महिला प्रेयसी सुद्धा या हत्याकांडात सहभागी होती. दोन्ही महिलांना कोर्टात सादर केलं, जिथे त्यांच्याबाबत अनेक खळबळजनक खुलासे झालेत.

सांगण्यात आलं आहे की, आईने आपल्या प्रेयसीसोबत मिळून मुलीला फारच निर्दयीपणे मारहाण केली होती. ज्यामुळे १६ महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या शरीरावर अनेक गंभीर जखमी होत्या. हे प्रकरण २०२० मधील आहे, ज्याची आता कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे.

'द सन यूके'च्या वृत्तानुसार, २० वर्षीय फेंकी स्मिथ आणि २८ वर्षीय सवाना ब्रॉकहिल एकत्र राहत होत्या. त्यांच्यासोबत स्मिथची १६ महिन्यांची मुलगी स्टार हॉब्सनही होती. 

ब्रॅडफोर्ड क्राउन कोर्टाला सांगण्यात आलं की, सप्टेंबर २०२० मध्ये चिमुकली स्टार हॉब्सनला रक्ताने माखलेल्या स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिच्या शरीरावर जखमांचे आणि मारहाण केल्याचे अनेक निशाण होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर हॉब्सनला वाचवता आलं नाही. याबाबत पोलिसांनी जेव्हा स्मिथ आणि ब्रॉकहिल यांची चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की, ती दुर्घटनेची शिकार झाली होती, ज्यामुळे जखमा झाल्या. पण चिमुकलीची स्थिती पाहून पोलिसांना महिलांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही.

कोर्टात वकिलांनी डॉक्टरांच्या रिपोर्टच्या हवाल्याने सांगितलं की, मुलीचा मृत्यू गंभीर आणि जोरदार प्रहार, बुक्की मारणे, पोटावर लाथ मारणे किंवा पायाखाली चिरडल्याने झाला होता. तिला वेगवेगळ्या वेळेवर टॉर्चर करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर हत्येचा दिवशी जास्त मार लागल्यावर महिलांनी बऱ्याच उशीरा अॅम्बुलन्सला फोन केला. एका व्हिडीओ क्लिपही कोर्टात दाखवण्यात आली. ज्यात मुलगी ओरडत आहे.

मुलीच्या उजव्या पायात दोन फ्रॅक्चर होते. रिपोर्टमध्ये डोक्याच्या मागच्या बाजूला फ्रॅक्चर आणि जखम होती. वकील कोर्टात म्हणाले की, क्लिपवरून हे समजून येतं की, मुलीला क्रूरतेने मारलं गेलं. वकील एलिस्टेअर मॅकडोनाल्ड म्हणाले की, मुलीच्या शरीराच्या टेस्टवरून समजलं की, तिला वेगवेगळ्या वेळेला गंभीर जखमा झाल्या होत्या. स्मिथ आमि ब्रॉकिहिलने आरोप फेटाळत तिला जखमा दुर्घटनेमुळे झाल्याचं सांगितलं.
 

Web Title: UK : Mother and her female lover killed 16 month old daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.