lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Paytm च्या शेअर्समध्ये आतापर्यंत ६२ टक्क्यांची घसरण; आता टार्गेट प्राईज ४५० रुपये करत मोठा झटका

Paytm च्या शेअर्समध्ये आतापर्यंत ६२ टक्क्यांची घसरण; आता टार्गेट प्राईज ४५० रुपये करत मोठा झटका

आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ६२ टक्क्यांची घसरण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 04:50 PM2022-03-17T16:50:14+5:302022-03-17T16:51:31+5:30

आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ६२ टक्क्यांची घसरण झाली आहे.

Paytm shares down 71%; Now the target price is Rs 450, a big shock | Paytm च्या शेअर्समध्ये आतापर्यंत ६२ टक्क्यांची घसरण; आता टार्गेट प्राईज ४५० रुपये करत मोठा झटका

Paytm च्या शेअर्समध्ये आतापर्यंत ६२ टक्क्यांची घसरण; आता टार्गेट प्राईज ४५० रुपये करत मोठा झटका

गेल्या काही दिवसांपासून काही गोष्टी या पेटीएमच्या (Paytm) बाजूनं घडत नसल्याचं दिसून येतं. नुकतंच पेटीएम पेमेंट्स बँकेला (Paytm Payments Bank) रिझर्व्ह बँकेनं (RBI) नवे ग्राहक जोडण्यावर बंदी घातली. तर कंपनीच्या शेअर्सचीही कामगिरी चांगली दिसत नाही. आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ७१ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यातच आता आणखी एक मोठा झटका लागला असून कंपनीचं टार्गेट प्राईज कमी करून ४५० रुपये करण्यात आलं आहे. मॅक्वायरी कॅपिटल सिक्युरिटीजच्या विश्लेषकांनी ही किंमत रिव्हाईज केली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयपीओ (Paytm IPO) आल्यापासून पेटीएमचे शेअर्स ६२ टक्क्यांनी घसरले आहेत. मॅक्वेरी कॅपिटल सिक्युरिटीजचे विश्लेषक सुरेश गणपति यांनी यापूर्वी पेटीएम शेअर्सचं टार्गेट प्राईज ७०० रुपये केली होती. आता Macquarie चे सुरेश गणपती यांनी पेटीएम शेअर्सचं टार्गेट प्राईज ४५० रुपये केली आहे. त्यांनी जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी लोअर व्हॅल्युएशनचा उल्लेख केला. पेटीएमच्या शेअर्सला त्यांनी अंडरपरफॉर्म रेटिंग दिलं आहे.

शेअर्समध्ये मोठी घसरण
मॅक्वायरी कॅपिटलच्या सुरेश गणपती यांनी पेटीएमसाठी आपल्या अर्निंग अथवा रेव्हेन्यू एस्टिमेट्समध्ये कोणताही बदल केलेला नाही. गुरुवारी पेटीएमचे शेअर्स ६.२८ टक्क्यांनी घसरून ५९४.२५ रुपयांवर आले आहेत. फिनटेक रेग्युलेशन्स आणि कठोर कम्प्लायन्स नॉर्म्स कंपनीसाठी समस्या निर्माण करणारे ठरू शकतात, असं सुरेश गणपती म्हणाले. ब्लूमबर्गकडून कम्पाइल केलेल्या डेटानुसार पेटीएम कव्हर करणारे ९ अॅनालिसिस्टचं १२ महिन्यांचं सरासरी टार्गेट प्राईज १२०३ रुपये आहे. कंपनीचं ५२ आठवड्यांची लो लेव्हल ५७२.२५ रुपये आहे. तर हाय लेव्हल १९६१.०५ रुपये आहे.

Web Title: Paytm shares down 71%; Now the target price is Rs 450, a big shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.