गुजरातेत कोरोनाचे १,५१० नवे रुग्ण

By | Published: December 5, 2020 04:08 AM2020-12-05T04:08:51+5:302020-12-05T04:08:51+5:30

पंतप्रधान सोमवारी पायाभरणी करणार आग्रा (उत्तर प्रदेश) - आग्रा येथील मेट्रो प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ...

1,510 new corona patients in Gujarat | गुजरातेत कोरोनाचे १,५१० नवे रुग्ण

गुजरातेत कोरोनाचे १,५१० नवे रुग्ण

googlenewsNext

पंतप्रधान सोमवारी पायाभरणी करणार

आग्रा (उत्तर प्रदेश) - आग्रा येथील मेट्रो प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सात डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर हजर राहणार आहेत. सध्या या समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. जगप्रसिद्ध ताजमहालच्या पूर्व गेटसमोर ड्रिल मशीनद्वारे प्रकल्पाचा शीलान्यास समारंभ होईल.

काश्मीरमध्ये उमेदवारावर हल्ला

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारावर अतिरेक्यांनी हल्ला केला असून, त्यात अनीसूल इस्लाम गनी जखमी झाले आहेत. या निवडणुकीतील हल्ल्याची ही पहिलीच घटना आहे. गनी हे अनंतवाग जिल्ह्यातून अपना पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत. त्यांचा हात व पायावर जखमा झाल्या आहेत.

बसखाली चिरडून तीन बालके ठार

मुजफ्फरनगर - भरधाव बसखाली चिरडून तीन बालकांचा मृत्यू झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला व बसची वाट पाहणाऱ्या तिघांचा अंत झाला. या अपघातात तीन महिला व दोन बालके गंभीर जखमी झाले आहेत. बसच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.

९५ किलो अमली पदार्थ जप्त

जम्मू - ९५ किलो अमली पदार्थांसह दोन तस्करांना जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात गजाआड करण्यात आले. ते दोघेही पंजाबचे रहिवासी आहेत. गुप्त खबर मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने एका धावत्या वाहनाला थांबविले व झडती घेतली असता हा माल सापडला. दोघांचीही चौकशी केली जात आहे.

कोरोनाच्या काळात निवडणुका नाही

अमरावती - कोरोना महामारी उद्रेकाच्या काळात राज्यात निवडणुका घेऊ नयेत, असा ठराव आंध्र प्रदेश विधानसभेने पास केला. फेब्रुवारी २०२१ मध्ये निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा विचार करीत असताना हा ठराव करण्यात आला आहे.

केलाँगचे तापमान उणे ६.७ अंश

सिमला - हिमाचल प्रदेशातील केलाँगचे तापमान शुक्रवारी सर्वांत कमी म्हणजे उणे ६.७ अंश नोंदले गेले. राज्याच्या पर्वतीय आणि मध्यम उंचीच्या भागात पाऊस व बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. किन्नौर जिल्ह्यात कल्पा येथे ०.१ तापमानाची नोेंद झाली.

महिलांसाठीची रेल्वे सुरू ठेवणार

चेन्नई - वर्दळ नसलेल्या काळात अत्यावश्यक सेवेतील महिलांसाठीच्या उपनगरीय रेल्वेगाड्या सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चेन्नईमध्ये उपनगरीय रेल्वेगाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार ते शनिवार या दिवसांमध्ये जास्त महिलांना प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे.

Web Title: 1,510 new corona patients in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.