मानसी नाईक या इंटरनॅशनल बॉक्सरसोबत आहे रिलेशनशीपमध्ये, फोटो शेअर करत खुद्द तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 01:10 PM2020-02-03T13:10:17+5:302020-02-03T13:10:42+5:30

मानसी नाईकने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो सोशल मीडियावर केला शेअर

Mansi Naik in relationship with International Boxer, sharing photos, revealing herself | मानसी नाईक या इंटरनॅशनल बॉक्सरसोबत आहे रिलेशनशीपमध्ये, फोटो शेअर करत खुद्द तिनेच केला खुलासा

मानसी नाईक या इंटरनॅशनल बॉक्सरसोबत आहे रिलेशनशीपमध्ये, फोटो शेअर करत खुद्द तिनेच केला खुलासा

googlenewsNext


मानसीनं आपली फॅशन स्टाईल जपली आहे. तसेच ती बऱ्याचदा तिच्या डान्स व फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. मात्र यावेळेस ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आज मानसीचा वाढदिवस असून तिने तिच्या वाढदिवसादिवशीच तिच्या रिलेशनशीपबद्दल सांगितलं आहे. तिने प्रेमात असल्याचे सांगून तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला आहे.

मानसी नाईक हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्या दोघांचा फोटो शेअर करत लिहिले की, यावर्षी मी स्वतःला गिफ्ट द्यायचे ठरवले तेही प्रेम व कमिटमेंटसोबत. ओळखा काय असेल ते. मेहनती, प्रेमळ व विश्वासू आणि कमिटेड व्यक्ती. हो मी प्रेमात पडली आहे. प्रदीप खरेरा तुझे माझ्या जगात स्वागत आहे. 


प्रदीप खरेरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल ना. प्रदीप हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता व मॉडेल आहे.


मानसी आणि प्रदीप कधीपासून प्रेमात आहेत आणि ते एकमेकांना कसे भेटले, हे अद्याप समजलेले नाही. 


मानसी नाईक हिने प्रेक्षकांना आपल्या नृत्याच्या अदांनी घायाळ केले आहे. 'बघतोय रिक्षावाला' म्हणत तिने मराठी प्रेक्षकांना आपल्या तालावर डोलायला लावले. ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅॅॅॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून अभिनेत्री मानसी नाईकच्या रूपाने मराठी इंडस्ट्रीला एक चांगली नृत्यांगना मिळाली आहे.

त्याचबरोबर एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचीदेखील ओळख तिने करून दिली आहे.

Web Title: Mansi Naik in relationship with International Boxer, sharing photos, revealing herself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.