आजच्या Apple Event मध्ये कोणते प्रोडक्ट होणार लाँच? इथे बघा इव्हेंट लाईव्ह  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 12:30 PM2021-10-18T12:30:32+5:302021-10-18T12:30:42+5:30

Apple Event 18 October: अ‍ॅप्पल आजच्या Unleashed Event मधून M1X चिपसेटसह Macbook Pro, Airpods 3 आणि Mini Mac हे प्रोडक्ट सादर करू शकते.  

Apple unleashed event on 18 october how to watch and what to expect  | आजच्या Apple Event मध्ये कोणते प्रोडक्ट होणार लाँच? इथे बघा इव्हेंट लाईव्ह  

आजच्या Apple Event मध्ये कोणते प्रोडक्ट होणार लाँच? इथे बघा इव्हेंट लाईव्ह  

googlenewsNext

Apple Unleashed Event: आज अ‍ॅप्पलचा नवीन लाँच इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरु होईल. हा इव्हेंट कंपनीच्या वेबसाईट आणि युट्युब चॅनलवरून थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच Apple TV वरून देखील या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण बघता येईल. या इव्हेंटमधून नवीन मॅक बुक प्रो मॉडेल आणि AirPods 3 सादर केले जाऊ शकतात.  

Apple Unleashed Event मध्ये कोणते प्रोडक्ट होणार लाँच?  

अ‍ॅप्पलच्या इव्हेंट टीजरमधून लाँच होणाऱ्या प्रोडक्टची माहिती मिळाली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार या इव्हेंटमधून दोन साईजेसमध्ये MacBook Pro मॉडेल लाँच करू शकते, हे लॅपटॉप कंपनीच्या M1X चिपसेटसह बाजारात येतील, ज्यात MagSafe चार्जिंग मिळू शकते.  

नवीन फ्लॅट एज डिजाईनसह हे लॅपटॉप सादर केले जाऊ शकतात. नवीन मॅक बुक 14-inch आणि 16-inch अशा दोन स्क्रीन साइजमध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच यावेळी कंपनी टचबारला डच्चू देऊ शकते.  

रिपोर्ट्सनुसार अ‍ॅप्पल हायएन्ड मॅक मिनी लाँच करू शकते, जो पॉवरफुल असेल. त्याचबरोबर कंपनी Airpods देखील लाँच करू शकते. या इव्हेंटमधून AirPods 3 लाँच केले जाऊ शकतात.  सॉफ्टवेयर लाँच बद्दल बोलायचे झाले तर WWDC मध्ये MacOS Monterey ची घोषणा अ‍ॅप्पलने केली होती. हा नवीन ओएस नव्या सफारी ब्राउजर, सेकेंडर स्क्रीन सारख्या फीचर्ससह या इव्हेंटमधून सादर केला जाऊ शकतो. आयओएस 15 सोबत या ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आता हा ओएस युजर्सच्या भेटीला येऊ शकतो.  

Web Title: Apple unleashed event on 18 october how to watch and what to expect 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.