पाच वेळा नात्यात अपयश मिळाल्यानंतर या अभिनेत्रीने 49 व्या वर्षी केला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 06:59 PM2019-09-24T18:59:49+5:302019-09-24T19:09:45+5:30

या अभिनेत्रीच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. 

Pooja Bedi, Engaged To Boyfriend Maneck Contractor | पाच वेळा नात्यात अपयश मिळाल्यानंतर या अभिनेत्रीने 49 व्या वर्षी केला साखरपुडा

पाच वेळा नात्यात अपयश मिळाल्यानंतर या अभिनेत्रीने 49 व्या वर्षी केला साखरपुडा

googlenewsNext
ठळक मुद्देबिग बॉसच्या घरात असताना पूजा अभिनेता आकाशदीप सेहगलच्या प्रेमात पडली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर देखील त्या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहाण्यात येत असे.

जो जिता वही सिंकदर या चित्रपटात आमिर खान आणि आयशा जुल्का यांच्या मुख्य भूमिका होत्या. पण त्याचसोबत या चित्रपटात देविकाच्या भूमिकेत असलेल्या पूजा बेदीला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. या चित्रपटानंतर ती लुटेरे, फिर तेरी कहानी याद आयी, शक्ती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली. तिने झलक दिखला जा, नच बलिये, बिग बॉस, फिअर फॅक्टर अशा रिॲलिटी शोमध्ये देखील हजेरी लावली होती. पूजाच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. 

बॉलिवूडशादीजने दिलेल्या वृत्तानुसार, पूजा आजवर पाच वेळा प्रेमात पडली आहे. पण तरीही आज ती सिंगल आहे. बॉलिवूडमध्ये पूजाने एंट्री केल्यानंतर पूजा आदित्य पांचोलीसोबत नात्यात होती. त्यावेळी आदित्यचे लग्न देखील झाले होते. पण तरीही ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण आदित्यचे तिच्याच घरात काम करणाऱ्या बाईसोबत संबंध आहेत हे पूजाला कळले आणि त्यामुळे तिने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. 

पूजाने मे 1994 मध्ये फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले. साडे तीन वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण लग्नाच्या 12 वर्षांनंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्या दोघांना दोन मुलं देखील आहेत. तिची मुलगी आलिया लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.

पूजा काही वर्षांपूर्वी नच बलिये या कार्यक्रमात झळकली होती. या कार्यक्रमात ती हनिफ हिलाल सोबत दिसली होती. तो एक कॉरिओग्राफर होता. पण काही वर्षांच्या अफेअरनंतर त्यांनी देखील वेगळे व्हायचे ठरवले. 

पूजा आणि द्वीती विक्रमादित्य अनेक महिने नात्यात होते. पूजाने तिचा 40 वा वाढदिवस द्वीतीसोबत गोव्यात साजरा केला होता. त्याच्यासोबत लग्न करण्याची देखील पूजाची इच्छा होती. पण या नात्याला द्वीतीच्या कुटुंबियांनी मान्यता न दिल्याने त्यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला असे म्हटले जाते.

बिग बॉसच्या घरात असताना पूजा अभिनेता आकाशदीप सेहगलच्या प्रेमात पडली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर देखील त्या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहाण्यात येत असे. आकाशने पूजाच्या नावाचा टॅटूदेखील हातावर काढला होता. ते दोघे लग्न करतील असे वाटत असतानाच त्यांनी अचानक ब्रेकअप केले. ते दोघे आजही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत.

 

पूजाने फेब्रुवारी 2019 मध्ये मॅनेक कॉन्ट्रक्टरसोबत साखरपुडा केला. तो तिचा शाळेतील मित्र असून ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत. 

Web Title: Pooja Bedi, Engaged To Boyfriend Maneck Contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.