LIVE : अहमदनगर: ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

By Admin | Published: February 16, 2017 09:03 AM2017-02-16T09:03:27+5:302017-02-16T15:00:36+5:30

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 16  - राज्यातील पहिल्या टप्प्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदानास सुरूवात ...

LIVE: Ahmednagar: boycott of villagers vote | LIVE : अहमदनगर: ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

LIVE : अहमदनगर: ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16  - राज्यातील पहिल्या टप्प्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदानास सुरूवात झाली असून मतदानास संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान अहमदनगरमधील पांगरमल येथे बनावट दारूमुळे चार जणांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने मतदान केंद्रांवर शुकशुकाट पसरला आहे. 
 
दरम्यान आजच्या निवडणुकीतून ग्रामीण भागातील जनतेचा कौल स्पष्ट होईल. आज जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली येथील एकूण २, ५६७ जागांकरिता ११, ९८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २४, ०३१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान करता येणार आहे. 'मिनी मंत्रालय’ अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये यावेळी राज्यपातळीवर कोणत्याच पक्षांची आघाडी आणि युती झाली नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित आहेत.
 
दरम्यान जळगावमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदानास सुरुवात झाली असून ६७ गटांसाठी २५६ तर १३४ गटांसाठी ५२० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर लातूर जिल्ह्यात १४९९ मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू झाले आहे. जि. प. च्या ५८ गट आणि दहा पंचायत समितीच्या ११६ गणासांठी मतदान होत असून जि. प. ला २३१ उमेदवार तर पंचायत समितीला ४२४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 
 
LIVE UPDATES
 
जळगाव : जिल्हा परिषद निवडणूक - मतदार याद्यांमध्ये घोळ, शिरसोली गावात काही मतदार मतदानापासून वंचित.
 
परभणी : मतदान यंत्रातील बिघाडामुळे पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथील केंद्र क्रं.3 वरील मतदान थांबले.
 
यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील कळसा येथे जिल्हा परिषद निवडणूक मतदान केंद्राबाहेर हाणामारी. काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण.
 
अहमदनगर : पांगरमल येथे बनावट दारुमुळे 7 जणांचा मृत्यू प्रकरण, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, मतदान केंद्रावर शुकशुकाट.
 
अहमदनगर  
  

जळगाव : आव्हाणे येथील एका मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये घोळ, घोळामुळे उमेदवारांमध्येही वाद, मतदान थांबवले.

जळगाव 

पाचोरा तालुक्यातील कु-हाड येथे मतदान केंद्राबाहेर दोन गटांत वाद, घटनास्थळी पोलीस दाखल, परिस्थिती आटोक्यात आणण्याचे पोलिसांची प्रयत्न.

 
 
 
 
 
 
अहमदनगर 
राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बजावला मतदानाचा हक्क
 
 
 
यवतमाळ
काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

 
 
चाळीसगाव तालुक्यात देवळी- तळेगांव जिल्हा परिषद गटातील अंधारी येथे एका नवरदेवाने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी प्रथम मतदान केले.
 
 

सायगाव येथील बीएसएफ जवान गोरखनाथ दिलीप जाधव यांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी केले मतदान.

बुलडाणा
सकाळी 9.30 वाजेपर्यंतची टक्केवारी
 
सकाळी 11.30 वाजेपर्यंतची टक्केवारी
 
 
 
 
 
 
 
https://www.dailymotion.com/video/x844r7b

Web Title: LIVE: Ahmednagar: boycott of villagers vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.