तयारीत राहा... तुमचा गृह कर्जाचा हप्ता वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 11:15 AM2022-12-02T11:15:55+5:302022-12-02T11:16:38+5:30

आरबीआयकडून पुन्हा व्याजदर वाढीची शक्यता

Be prepared... your home loan installment is likely to increase by RBI | तयारीत राहा... तुमचा गृह कर्जाचा हप्ता वाढण्याची शक्यता

तयारीत राहा... तुमचा गृह कर्जाचा हप्ता वाढण्याची शक्यता

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील महागाईवर काही प्रमाणात नियंत्रण येताना दिसत आहे. मात्र, त्यात अपेक्षेनुसार घट झालेली नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँक व्याजदर वाढीचे धोरण कायम ठेवण्याची शक्यता आहे. येत्या ५ ते ७ डिसेंबरदरम्यान रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार असून, या बैठकीत रेपो दरात २५ ते ३५ आधार अंकांची (बीपीएस) वाढ केली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या घोषणेकडेही लक्ष राहणार आहे. रेपोरेट वाढल्यास कर्जाचा हप्ता वाढणार आहे.

जागतिक पातळीवर वस्तूंच्या किमती कमी होणे हा मोठा दिलासा आहे. मात्र, भारतातील महागाईचा दर अजूनही ६ टक्क्यांच्या वर आहे, ही चिंतेची बाब आहे. 

किती वाढू शकतात व्याजदर?
n केअर रेटिंगच्या मुख्य अर्थतज्ज्ञ रजनी सिन्हा यांनी सांगितले की,  आगामी बैठकीत रेपो दर ३५ आधार अंकांनी वाढेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यानंतर येणाऱ्या महिन्यांत ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) महागाईचा दर आणखी कमी होईल. 
n या वित्त वर्षाच्या अखेरीस तो ६ टक्क्यांच्या खाली येण्याची शक्यता आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाईचा दर मे-जूनमध्ये १६ टक्क्यांनी घसरून ८ टक्क्यांवर आला आहे.

महागाई उच्चांकी पातळीवर गेल्यामुळे आरबीआयने मे महिन्यात रेपोरेटमध्ये वाढ केली होती. 
तेव्हापासून १९० बीपीएसची वाढ 
झाली आहे. 
आणखी वाढ करण्याचे संकेत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी यापूर्वी दिले होते. 

मार्चपर्यंत दिलासा नाही 
महागाई ६ टक्क्यांच्या वर असल्यामुळे रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई मार्चपर्यंत ६ टक्क्यांच्या खाली येण्याची शक्यता नाही.  

Web Title: Be prepared... your home loan installment is likely to increase by RBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.