स्वच्छ भारत अभियान : केंद्र शासनाची टीम शहरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 06:43 PM2019-01-14T18:43:07+5:302019-01-14T18:43:20+5:30

स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाची एक टीम रविवारी दुपारी शहरात दाखल झाली. या टीमने शहराच्या विविध भागांत पाहणीसुद्धा सुरू केली.

Clean India Campaign: Central Government team enter cities | स्वच्छ भारत अभियान : केंद्र शासनाची टीम शहरात दाखल

स्वच्छ भारत अभियान : केंद्र शासनाची टीम शहरात दाखल

googlenewsNext

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाची एक टीम रविवारी दुपारी शहरात दाखल झाली. या टीमने शहराच्या विविध भागांत पाहणीसुद्धा सुरू केली. केंद्र शासनाच्या या टीमची माहिती मनपा प्रशासनाने अत्यंत गोपनीय ठेवली. सायंकाळपर्यंत दस्तुरखुद महापौरांनाही प्रोटोकॉल म्हणून याची कल्पना देण्यात आली नव्हती.

मागील महिन्यात राज्य शासनाचीही टीम शहरात दाखल झाली असताना मनपाकडून प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात मागील चार वर्षांपासून सर्वेक्षण करण्यात येत आहे. देशभरात इंदूर शहर स्वच्छतेत प्रथम येत आहे. औरंगाबाद शहरानेही स्वच्छतेत मोठी भरारी घ्यावी यादृष्टीने महापालिकेकडून कोणत्याच उपाययोजना करण्यात येत नाहीत. १६ फेबु्रवारी २०१८ पासून शहरात कचराकोंडी सुरू आहे.

आजपर्यंत महापालिकेला कचऱ्याचा प्रश्न सोडविता आला नाही. मागील वर्षीही २६ आणि २७ फेबु्रवारी रोजी केंद्र शासनाच्या टीमने शहरातील स्वच्छतेची पाहणी केली होती. शहरात जिकडे तिकडे कचºयाचे डोंगर साचलेले असतानाही शहराला १२८ व्या क्रमांकाची रँकिंग देण्यात आली होती. केंद्राच्या या रॅकिंगवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. यंदा केंद्र शासनाने सर्वेक्षणाचे निकष बदलले आहेत. दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा गट वेगळा केला आहे. यामध्ये देशभरातील ६० पेक्षा अधिक शहरांचा समावेश आहे. औरंगाबादचे सर्वेक्षणही याच प्रवर्गात होणार आहे.

५ जानेवारीनंतर केंद्र शासनाने नेमलेल्या कार्वी या खाजगी संस्थेचे कर्मचारी कोणत्याही क्षणी शहरात दाखल होतील अशी कल्पना मनपाला देण्यात आली होती. रविवारी सकाळी मनपा अधिकारी व कर्मचाºयांना केंद्राचे पथक येणार असल्याचे कळाले. दुपारनंतर पथकातील तीन टेक्निकल अ‍ॅसेसर दाखल झाले. त्यांनी ७ ते ८ वॉर्डांमध्ये फिरून स्वच्छतेची पाहणीही केली. दोन ते तीन दिवस टीम शहरात पाहणी करणार असल्याचे घनकचरा प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.


महापालिकेचे गुण कशामुळे कमी होणार
शहरात जमा होणारा कचरा मनपा शास्त्रोक्त पद्धतीने जमा करीत नाही. ओला व सुका मिक्स कचरा जमा करते. जमा झालेला कचरा शहराबाहेर चार ठिकाणी नेऊन निव्वळ टाकण्यात येतो. कचºयावर फक्त चिकलठाण्यात नावालाच प्रक्रिया होते.


वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक शौचालयांसाठी महापालिकेने ज्या पद्धतीने काम करायला हवे तसे अजिबात केलेले नाही. महिलांसाठी दोन चार ठिकाणीच शौचालये आहेत. शहराची गरज पाहता सार्वजनिक शौचालये नाहीत.
शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकांकडून महापालिकेने ओला व सुका कचरा जमा करणे अपेक्षित आहे. मनपा खाजगी कंपनीच्या भरवशावर आजपर्यंत मूग गिळून आहे. कंपनीने आजपर्यंत कामच सुरू केलेले नाही.
बाजारपेठेत दोन वेळेस साफसफाई करावी, एकदा कचरा जमा करण्यात यावा, असेही निकष केंद्राने सर्वेक्षणात ठरवून दिले आहेत. मनपा साफसफाई एकदाच करते. कचरा मनात येईल तेव्हाच जमा करते.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर १२०० हिरवे, निळे टस्टबीन ठेवावेत. महापालिकेने अशी व्यवस्था कुठेच केलेली नाही.
शहरात जमा होणाºया कचºयावर शंभर टक्के प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. महापालिकेने एकही प्रक्रिया केंद्र सुरू केले नाही.

तीन वर्षांत शहराची क्रमवारी
२०१६- ५६
२०१७- २९९
२०१८- १२९

 

Web Title: Clean India Campaign: Central Government team enter cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.