दोन हंगामांचे दुःख बाजूला ठेवून द्राक्ष उत्पादक लागला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 08:35 PM2021-09-16T20:35:30+5:302021-09-16T20:41:37+5:30

येवला/जळगाव नेऊर : गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटाबरोबर कोरोना संकटाचाही फटका बसला असून, मागील दोन वर्षांचे दुःख बाजूला ठेवून उत्पादकांनी हंगामाला सुरुवात केली आहे.

Putting aside the grief of two seasons, the grape grower started working | दोन हंगामांचे दुःख बाजूला ठेवून द्राक्ष उत्पादक लागला कामाला

जळगाव नेऊर परिसरात सुरू असलेली द्राक्षाची छाटणी.

Next
ठळक मुद्देयेवला तालुक्यात हंगामाला सुरुवात : अर्ली द्राक्ष छाटणीचाही प्रयोग

येवला/जळगाव नेऊर : गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटाबरोबर कोरोना संकटाचाही फटका बसला असून, मागील दोन वर्षांचे दुःख बाजूला ठेवून उत्पादकांनी हंगामाला सुरुवात केली आहे.

येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे नगदी पीक असले तरी पालखेड लाभ क्षेत्राखाली तसेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतात शेततळे उभारून द्राक्ष बागेची लागवड केलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी अर्ली द्राक्ष छाटणीचा प्रयोग गेला असून द्राक्ष छाटणीस सुरुवात झाली आहे.

द्राक्षबाग म्हटले की एप्रिल छाटणीपासून द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची कामे चालू होतात. छाटणी झाल्यानंतर सपकेन, केन याबरोबरच काडी परिपक्वतेसाठी विविध औषधांच्या मात्रा देऊन साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी द्राक्षाची छाटणी करतात. पण गेल्या दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता, दोन वर्षांत कधी कोरोनाचे संकट, तर कधी निसर्गाचे संकट, यातून वाचून द्राक्षबाग आली तर व्यापाऱ्यांचे संकट, अशा अनेक संकटांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ग्रासल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी झालेले आहे.

सध्या ढगाळ वातावरण व पावसाची काही प्रमाणात रिमझिम सुरू असतानाही शेतकऱ्यांनी द्राक्ष (ॲक्टोबर) छाटणीचा प्रारंभ केला आहे.


पुनश्च हरिओम
सलग दोन वर्षे कोरोना महामारीमुळे द्राक्ष मातीमोल भावाने विकावा लागली आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. चालू द्राक्ष हंगामात उपलब्ध द्राक्षाची टप्प्याटप्प्याने छाटणी करून उत्पादन घेण्याचे शेतकऱ्यांचा मानस आहे. या वर्षीही द्राक्ष पिकास बाजारभाव व निसर्ग कसा असेल हे आज जरी सांगणे शक्य नसले तरी शेतकरी सगळे विसरून पुनश्च कामाला लागला आहे हे नक्कीच..!

खर्चात वाढ
द्राक्ष पीक दिवसेंदिवस खर्चीक बनत चालले असून औषधे, रासायनिक खते, लिक्विड खते यांच्यात झालेली भरमसाट वाढ तसेच मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने चार पैसे अधिक देऊन कामे करून घ्यावी लागत आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे द्राक्ष उत्पादक मेटाकुटीस आलेला आहे. दरवर्षाच्या तुलनेत यंदा अर्ली छाटणीस प्रारंभ केला आहे. दोन वर्षांपासून कर्जबाजारी झालेला द्राक्ष उत्पादक नफा-तोटा विसरून पुन्हा नव्याने स्वप्न साकार करण्यासाठी कामाला लागला आहे. त्या ला हवी आहे फक्त आता निसर्गाची साथ..!
- सुदाम सौंदाणे, द्राक्ष उत्पादक, शेवगे

 

Web Title: Putting aside the grief of two seasons, the grape grower started working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.