९१५ कोटींच्या घोटाळ्यात ‘उशेर’चा एमडी अटकेत, बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 07:21 AM2021-09-21T07:21:25+5:302021-09-21T07:21:47+5:30

कोट्यवधीच्या बँक घोटाळ्याप्रकरणी मनी लँड्रिगच्या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

MD of 'Usher' arrested in Rs 915 crore scam, ED takes action in bank scam | ९१५ कोटींच्या घोटाळ्यात ‘उशेर’चा एमडी अटकेत, बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई

९१५ कोटींच्या घोटाळ्यात ‘उशेर’चा एमडी अटकेत, बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई

Next

मुंबई :   तब्बल १५ शेल कंपन्यांची स्थापना करीत त्या माध्यमातून ९१५ कोटींची रक्कम वर्ग करीत फसवणूक केल्याच्या आरोपावरून उशेर ऍग्रो लिमिटेड कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक विनोद चतुर्वेदी याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली असून त्याला ५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोट्यवधीच्या बँक घोटाळ्याप्रकरणी मनी लँड्रिगच्या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

चतुर्वेदीला माय बँकेत १८ कोटींचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून अटक करण्यात आली होती. तामिळनाडू मर्कंटाइल बँकेत अन्य बनावट कागदपत्रे व कंपन्यांची स्थापना करून त्याने आणखी कर्ज उचलल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याला १८ सप्टेंबरला अटक केली. चतुर्वेदीसह मनोज पाठक आणि इतरांविरूद्ध जानेवारी २०१९ मध्ये पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला होता.
 

Web Title: MD of 'Usher' arrested in Rs 915 crore scam, ED takes action in bank scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.