बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीची डोंगरावरून उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 01:47 PM2020-08-07T13:47:20+5:302020-08-07T13:57:13+5:30

शहरातील २० वर्षीय तरुणीवर  ४ आॅगस्टला भांगसीमाता गडावर दोन अनोळखी तरुणांनी युवकाला मारहाण करुन एकाने तिच्यावर बलात्कार केला.

The main accused in the rape case committed suicide by jumping from a mountain | बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीची डोंगरावरून उडी मारून आत्महत्या

बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीची डोंगरावरून उडी मारून आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देअटकेच्या भीतीने होता फरार खवड्या डोंगरावरून मारली उडी

वाळूज महानगर : दोन दिवसांपूर्वी भांगसी गडावर २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीने गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास खवड्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली. राऊसाहेब भाऊसाहेब माळी (३१, रा. तीसगाव परिसर), असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. 

शहरातील २० वर्षीय तरुणीवर  ४ आॅगस्टला भांगसीमाता गडावर दोन अनोळखी तरुणांनी युवकाला मारहाण करुन एकाने तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. यानंतर पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून फरार झालेल्या दोघांविरुद्ध दौलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी राजू माळी याला बुधवारी (दि.५) ताब्यात घेतले. मात्र, रात्री ८ वाजेच्या सुमारास लघुशंकेचा बहाणा करून राजू माळी हा दौलताबाद ठाण्यातून पळून गेला होता. विशेष म्हणजे बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपी राजू व राऊसाहेब हे सख्खे भाऊ असून, ते वीटभट्टीवर काम करतात. 

'तिने केली विनवणी, मात्र नराधमांनी नाही जुमानले'; मित्राला मारहाण करून तरुणीवर दोघांचा अत्याचार

दरम्यान, मुख्य आरोपी राऊसाहेब भाऊसाहेब माळी हा अटकेच्या भीतीमुळे फरार झाला होता. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याने तीसगावच्या खवड्या डोंगरावरून उडी मारली. हा प्रकार लक्षात येताच सहायक पोलीस आयुक्त गुणाजी सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड, एमआयडीसी वाळूज ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत, दौलताबादच्या निरीक्षक राजश्री आडे आदींनी घटनास्थळ गाठून गंभीर जखमी राऊसाहेब माळी याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

बलात्काराचे दोन गुन्हे 
राऊसाहेब माळी याच्याविरुद्ध काही वर्षांपूर्वी तीसगाव परिसरात एका तरुणीचा बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकासमोर त्याने उच्चदाबाच्या वीज वाहिनीवरून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. 

Web Title: The main accused in the rape case committed suicide by jumping from a mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.